पद – प्रतिष्ठा ही व्यक्तींच्या कार्य कर्तुत्वाने मिळत असते – भगवान फुलसौंदर

0
100

नूतन सभापती सौ.बोरुडे यांचा मोरया पतसंस्थेच्यावतीने सत्कार

अहमदनगर प्रतिनिधी – आपण करत असलेल्या कामातून इतरांना आनंद मिळावा, त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी काम केले पाहिजे. सामाजिक व राजकीय जीवनात पद – प्रतिष्ठा ही व्यक्तींच्या कार्य कर्तुत्वाने मिळत असते. बोरुडे कुटूंबियांनी नेहमीच व्यवसायिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटविला आहे. अनिल बोरुडे व सौ.पुष्पा बोरुडे यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले, त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून नगरसेवक म्हणून कायम निवडून येत आहेत. त्यांच्या कार्याची दाखल घेऊन आता मनपाच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची संधी मिळाली आहे. या पदाच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासात योगदान देतील. स्नेहजणांच्या चांगल्या कार्यात आमचे नेहमीच सहकार्य राहिले आहे, असे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी व्यक्त केला.

मोरया पतसंस्थेच्यावतीने महिला बाल कल्याण समितीच्या नूतन सभापती पुष्पा बोरुडे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, गोरक्षनाथ हजारे, डॉ.सुदर्शन गोरे, सुनिल राऊत, अंबादास चौधरी, हर्षल म्हस्के, अनिल शिंदे, चंद्रकांत बोरुडे आदि उपस्थित होते. यावेळी सी.ए.परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल संकेत राठोड व उद्योजक विनायक काळे यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सौ.पुष्पा बोरुडे म्हणाल्या, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करतांना पदापेक्षा कामाला महत्व दिले. नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांच्या समस्या दूर झाल्या पाहिजे, यासाठी आपण कायम प्रयत्नशील असतो. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने आपली सभापतीपदी निवड झाली आहे. या पदाच्या माध्यमातून महिला व बालकांच्या प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु. शासनाच्या विविध योजना मनपाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा आपला प्रयत्न राहिल. आज केलेल्या सत्कारामुळे आपली जबाबदारी वाढली असून, यातून आपणास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.

शेवटी सुनिल राऊत यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here