परभणी – जिल्ह्यात सर्वच तालुक्यात आज सकाळ पासून मोठ्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले.आधी पडलेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले होते पण त्यातच आज झालेल्या पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुर्णा तालुक्यातील बलसा गावातील पिंगळगडा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे नदीचे पाणी गावातील सर्व शेतकऱ्याच्या शेतात घुसले आहे,पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .तसेच ताडकळस रस्ता पूर्णतः बंद झाल्यामुळे आजू बाजूच्या गावांचा संपर्क तुटला आहे. हा पाऊस म्हणजे शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा ठरत आहे. परभणी जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यात कुठे कमी तर कुठे अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे.
तरी या भागातील नागरिक, शेतकरी यांचे या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून काहीतरी मदत करावी.अशी मागणी होत आहे.