पराग डफळापुरकर यांचे पुनर्विकास – नवनिर्मितीचा दृष्टीकोन या विषयावर व्याख्यान संपन्न.

- Advertisement -

आर्किटेक्टस् इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो. यांच्या वतीने आयोजित कार्यशाळेत आर्की. अविनाश देखणे आणि आर्की.

पराग डफळापुरकर यांचे पुनर्विकास – नवनिर्मितीचा दृष्टीकोन या विषयावर व्याख्यान संपन्न.

भविष्यात जुन्या इमारतींचा पुनर्विकास हा नगरसाठी नवनिर्मितीचा महामार्ग ठरणार – आर्की.अविनाश देखणे

नगर  – आर्किटेक्टस् इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो. अहमदनगर आणि पोलाद स्टील जालना यांच्या वतीने आयोजित नॉलेज सीरिज अंतर्गत पुण्यातील नामवंत आर्की. अविनाश देखणे आणि आर्की. पराग डफळापुरकर यांचे पुनर्विकास – नवनिर्मितीचा दृष्टीकोन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पुणे-मुंबई नंतर आता अहमदनगर मध्ये रीडेव्हलपमेंट म्हणजे पुनर्विकासाची कामे जोर धरू लागली आहेत.
जुन्या इमारती ज्यांचे आयुष्य संपत आले आहे. अश्या इमारतीवर अनेकांचे मालकी हक्क असतात त्यावेळी विकसक त्यांचे योग्य प्रमाणात प्रॉफिट बाजूला काढून प्रत्येकाला त्या प्रमाणात नवीन इमारतीत जागा उपलब्ध करून देतात. यासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर बाबी, तांत्रिक मंजुरी याविषयी पराग डफळापुरकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. पुण्यात कोथरूड परिसरात अविनाश देखणे यांचे जवळपास ५०-५५ प्रकल्प पुनर्विकासाच्या माध्यमातून चालू आहेत.
या क्षेत्रात काम करण्यास नगर मध्ये व संस्थेतील सभासदांना मोठी संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. अध्यक्ष रमेश कार्ले यांनी नॉलेज सीरिज अंतर्गत आपण विविध नवीन विषयांच्या माध्यमातून सभासदांच्या ज्ञानात भर घालण्याचे काम करत असल्याचे नमूद केले. यावेळी पोलाद स्टील कंपनीचे अधिकारी तसेच आर्की. मीनल काळे, अविनाश कुलकर्णी, एस यू खान, प्रकाश जैन, प्रथमेश सोनावणे, मयुरेश देशमुख, अन्वर शेख, यश शहा आणि बहुसंख्य सभासद उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद काकडे यांनी केले तर प्रदिप तांदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!