पाईपलाईन रोड वाणी नगर येथील बिल्डर्स व राजकीय वरदहस्त असलेल्या गुंड लोकांनी अडाणी व विधवा महिलेची शेत जमीन बळकवण्याचा केला प्रयत्न.
अहमदनगर (प्रतिनिधी)- पाईपलाईन रोड वाणी नगर येथील रहिवासी वेणूबाई विठ्ठल वाणी यांची शेत जमीन गट. नं. २५/१ब, २५/१क व २५/१ड असून या मिळकतीवर बिल्डर्स व राजकीय वरदहस्त असलेले गुंड पवनकुमार नंदकिशोर अग्रवाल, आनंद प्रदीपकुमार अग्रवाल, हेमलता नवनाथ म्हस्के, राम शंकर शेळके यांनी मिळकतीमध्ये पोलिसांची मदत घेऊन व उपअधीक्षक भूमी अभिलेख अहमदनगर यांच्याकडे खोटा मोजणीचा अर्ज देऊन १९ एप्रिल २०२४ रोजी जमीन बळकावण्यासाठी अनअधिकाराने आले व रेणूबाई विठ्ठल वाणी व इतरांनी त्यांना मोजणीस हरकत घेतली व सदरच्या मिळकतीत वाणी व इतरांची नावे असतानाही व त्यांना मोजणीची कोणतीही लेखी नोटीस न देता वरील लोकांनी सहमत करून व पोलिसांना हाताशी धरून जमीन मोजणी करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी रेणूबाई वाणी व इतरांनी त्यास हरकत घेतली असता उपाधीक्षक भूमी लेख अहमदनगर यांच्या कार्यालयात मिळकतीचा वाद चालू असून मोजणी करण्यास हरकत असल्याबाबत लेखी अर्ज दिलेला होता परंतु वास्तविक पाहता वेणूबाई विठ्ठल वाणी व इतरांची नावे उताऱ्यावर असून पीक पाहणी सदरी विभागीय अधिकारी अहमदनगर यांनी आरटीएस अपील क्रमांक ७१/२०११ मध्ये दिनांक ७ मार्च २०१५ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे सदर मिळकतीच्या सातबारा उताऱ्याला खुद वस्तीपड म्हणून नोंद करण्यात आलेली असून देखील हे गुंड प्रवृत्तीचे लोक ताबा गँग जागा बळकवण्याचां प्रयत्न करत असल्याने यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
- Advertisement -