पाचंग्रीमध्ये हॉटेल मालकाकडून वेटरचा खुन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

चोवीस तासाच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळण्यास पीआय मनिष पाटील यांना यश

 

अंमळनेर प्रतिनिधी – सुनील आढाव

पाटोदा तालुक्यातील पाचंग्रीमध्ये हॉटेल मालकाकडून करण्यात आलेल्या मारहाणीत वेटरचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे पाटोदा तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन यातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील यांना यश आले आहे.

पाटोदा तालुक्यातील पाचंग्रीमध्ये हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बबन भाऊसाहेब कुलट यांना २१ नोहेंबर रोजी हॉटेल मालक अंगद मुंढे यांनी कशाच्या तरी कारणांवरुन त्याच्या मांडीवर दंडावर पाठीवर कशानेतरी मारहाण केल्यामुळे बबन कुलट हे मयत झाले होते बबन कुलट यांचा मारहाणीमुळे मृत्यू होताच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांची डेथ बॉडी भायाळा ते कचरवाडी रोडवरील डोंगर घाटात दरीमध्ये देखील अंगद मुंढे यांनी फेकून दिली होती.

हॉटेल मालक अंकुश मुंढे यांनी केलेल्या मारहाणीत हॉटेल मधील कामगार बबन भाऊसाहेब कुलट वय वर्षे ४६ रा.खडकवाडी ता.पारनेर जि.अहमदनगर यांचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद २२ नोहेंबर रोजी रोहित बबन कुलट रा.खडकवाडी ता.पारनेर जि.अहमदनगर यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिली आहे.

पाचंग्री येथील खुन करणाऱ्या आरोपीला चोवीस तासाच्या आत पाटोदा पोलीस ठाण्याचे पी आय मनिष पाटील यांनी ताब्यात घेतले आहे.याकामी त्यांना मदत सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर, पी एस आय अफरोज पठाण सह पोलीस कर्मचारी बाळु सानप,सुनिल सोनवणे,टेकाळे,क्षीरसागर,डोके यांनी केली असुन या प्रकरणाचा पुढील तपास हा डीवायएसपी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील हे करत आहेत .

——–

चोवीस तासाच्या आत आरोपी अटक

पाचंग्री मध्ये हॉटेल मालकाच्या मारहाणीत एकाचा खुन झाला असल्याची माहिती पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ एका आरोपीस गजाआड केले तर एक जणाला चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.

———

पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील यांनी तपासाची चक्रे गतीमान फिरवल्यामुळे पाटोदा पोलीस ठाणे हद्दीतील बहुतांश प्रकरणातील गुन्हेगारांना गजाआड करण्यास त्यांना यश आले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!