अहमदनगर (प्रतिनिधी) –
अर्जदार विष्णू कर्णिक यांच्या मुलीचा पैशापायी शारीरिक व मानसिक छळ करून जबरदस्तीने मृत्युमुखी पाडणाऱ्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्याचं सोडून अभय देणाऱ्या घारगाव पोलिसांना कारवाईचे त्वरित आदेश देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे मागणी करताना वडील प्रशांत कर्णिक, संदीप कर्णिक, संजय कर्णिक, उत्तम जोरवर, संगीता कर्णिक, अक्षय कर्णिक आदी उपस्थित होते.
पाच तोळे सोने व दोन लाख रुपय माहेरून आणावेत यासाठी विवाहितेचा सासरी विवाहितेचा सासरी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तिचा नवरा सासू सासरे नणंद व तिच्या नवऱ्याचा मामा यांच्याविरोधात घारगाव पोलीस स्टेशन ता.संगमनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आरोपींनी वरील प्रमाणे माझ्या मुलीने माहेरून पैसे आणावेत अशा चुकीच्या हट्टापायी व धनाच्या लालसेपायी तिचा अमानुष छळ करून तिला जाणीवपूर्वक आत्महत्येस प्रवृत्त केले आहे जबरदस्तीने विषारी औषध पदार्थ पासून तसेच तिचा जीव वाचविण्यास प्राधान्य देण्याऐवजी तिचा जीव जाण्यासाठी वैद्यकीय उपचार सुरू करण्यास मुद्दाम विलंब लावून डॉक्टरांना उपचारासाठी आवश्यक ती सर्व सत्य माहिती न देता चुकीची व उडवाउडवीची माहिती देऊन जाणीवपूर्वक तिला मृत्यूच्या दारात लोटले अशी आमची खात्री आहे त्यामुळे माझे विवाहित मुलीचे मृत्यूस तिचा नवरा सासू सासरे नणंद व तिच्या नवऱ्याचा मामा हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार माझ्या मयत मुलीस मृत्यूपश्चात त्वरित न्याय मिळण्यासाठी अकोले पोलिसांनी उपरोक्त आरोपींपैकी माझ्या मयत मुलीचा नवरा सासरा सासू नणंद व माझ्या जावयाचा मामा या पाच जणांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांनी केवळ माझ्या मयत मुलीचा पती व तिचा सासरा यांना अटक केली आहे तथापि सदर गुन्ह्यातील उर्वरित तीन आरोपी तिची सासू नणंद व तिच्या पतीचा मामा या तिघांना कायद्याचा हिसका न दाखवता अटक न करताच सोडून दिले आहे त्यामुळे पोलिस व कायदा आमचे काहीही करू शकत नाही या गैरसमजात ते तिघेही आज पावेतो काहीच न घडल्या गत व कोणत्याही केदा शिवाय उजळ माथ्याने ते समाजात मोकाटपणे वावरत आहे व या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या घारगाव पोलिसांच्या संशयास्पद वर्तनामुळे व तोंडदेखल्या कारवाईमुळे आमच्या कुटुंबावर मोठा अन्याय झाला आहे आणि भविष्यातही असेच गैरप्रकार रोखणे व समाजात घडत राहिले तर आमच्या मुलीसारख्या कित्येक मुलींना गुन्हेगार यामुळे मृत्युमुखी पडतील व हेच गुन्हेगार समाजात उजळ माथ्याने वावरत आहे त्यामुळे गुन्हे दडपण्यासाठी कार्यरत असणाऱ्या गृह व प्रत संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना राजकीय पदाधिकाऱ्यांना पाठिशी न घालता त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करून मयत मुलगी सौ. पूजा सागर मोहिते याला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.