कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत तालुक्यातील पाटेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील पाटेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांची विशेष सभा अँड कैलास शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज झाली.संचालक मंडळाने सर्व सभासदांना एकतीस मार्च २०२० चे शेअर्स भांडवलावर दहा टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन श्रीहर्ष शेवाळे म्हणाले की,पाटेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही तालुक्यातील अग्रगण्य संस्था आहे.सातत्याने शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून आपण करीत आहोत, संस्थेला यावर्षी निव्वळ नफा ३५ लाख पाच हजार रुपये झाला असून,ही सेवा सोसायटी वर्ग ब श्रेणीमध्ये आहे. संस्थेची वसुली येणे कर्जाच्या प्रमाणात बँक पातळीवर शंभर टक्के व संस्था पातळीवर ९८ टक्के आहे.या सेवा संस्थेचा कारभार हा अतिशय काटकसरीने चालू असून,संस्थेचे उपाध्यक्ष व संचालक व सभासद संस्थेची स्थावर इमारत होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत.
एवढी उपस्थित सभासदांनी देखील संस्थेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचे १०% लाभांश देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आभार मानले.
यावेळी व्हाईस चेअरमन अमोल लाड,सेक्रेटरी सतीश शेलार, दादासाहेब पाटील, सतीश भंडारे,ज्ञानदेव लाड, विलास लाड,रामू झिंगे,बाबा मेंगडे,भिकू पवार,कैलास मोरे,लताबाई लाड,शोभा डुकरे,जयसिंग जाधव,ईश्वर कदम हे संचालक मंडळ व ग्रामस्थ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.