पाटोदा पोलीस ठाणे हद्दीत गणपती विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार

0
105

पोलीस निरीक्षक मनिष पाटील,एपीआय कोळेकर यांची माहिती.

अंमळनेर प्रतिनिधी – कोवीडच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जन मिरवणुकींवर मोठ्या प्रमाणात प्रशासनाने निर्बंध घातले होते परंतु गणेश मंडळांनी देखील कोवीडचे नियम पाळून गणपती विसर्जन शांततेत केले यामुळे पाटोदा पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्ये गणपती विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडलेल्या असल्याची माहिती पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील व एपीआय धरणीधर कोळेकर यांनी दिली .

रविवारी गणपती विसर्जन असल्यामुळे पाटोदा पोलिसांकडून गणपती मंडळांवर वॉच ठेवण्यात आला होता गणपती विसर्जन मिरवणुका शांतपणे व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील हे स्व:ता लक्ष ठेवून होते .

गणपती विसर्जन म्हटले कि शांतता भंग होणार वेळ प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होणार म्हणून पाटोदा पोलिसांकडून गणपती मंडळांना आगोदरच गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सुचना देण्यात आलेल्या होत्या यामुळे यंदा कोवीडच्या पार्श्वभूमीवर गणपती मंडळांनी देखील पोलीस प्रशासनाच्या आदेशाचे पालन करुन अत्यंत साध्या पध्दतीने गणपती विसर्जन केले .

गणपती विसर्जन मिरवणुकां दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील हे दिवसभर पाटोदा पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्ये जाऊन लक्ष ठेवून होते गणपती विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील यांच्या नेतृत्वाखाली एपीआय धरणीधर कोळेकर ,पोलीस कर्मचारी बाळु सानप ,सोनवणे ,डोके ,सोळंके सह आदींनी अथक परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here