पाणी जपून वापरा; शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत;महानगर पालिकेकडून आवाहन.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी : महावितरण आणि पारेषण कंपनीकडून ३३ केव्हीच्या मुळा डॅम वाहिनीचे फिडर शिफ्टींग आणि दुरुस्ती कामासाठी सकाळी १०.३० ते ०५ वाजेपर्यंत भारनियमन घेण्यात येणार आहे. या वेळेत अहमदनगर महापालिकेमार्फत शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे देखील १०.३० ते ५.०० वाजेपर्यंत होणार आहेत. या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही.

त्यामुळे शनिवारी (दि.७) बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, सारसनगर, बुरुडगावरोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर आदी परिसरास पाणीपुरवठा होणार नाही. या भागाला रविवारी (दि.८) पाणी देण्यात येईल.

मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागासह गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हडको, स्टेशन रोड, विनायकनगर आदी भागाला रविवार ऐवजी सोमवारी (दि.९) पाणी मिळेल.

तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातील सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्तगल्ली आदी भागास मंगळवारी (दि.१०) पाणीपुरवठा होणार आहे.

शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करुन उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आले आहे अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहील. नागरीकानी याची नोंद घेऊन पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन मनपाने केले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!