- Advertisement -
लंके साहेबाचा प्रचार का करतो ? विखे साहेबाचा कर !
विखेंचे कार्यकर्ते मारीत सुटले !
पाथर्डी तालुक्यात आणखी एकाला मारहाण
पाथर्डी प्रतिनिधी – लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वीच राजकीय वातावरण अतिशय तप्त झाले असून नीलेश लंके यांचा प्रचार करतो म्हणून खा. डॉ. सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी पाथर्डी तालुक्यात आणखी एकाला बेदम मारहाण केली. डॉ. विखे यांच्या अंगरक्षकाने लंके यांच्या जनसंवाद यात्रेत सहभागी झाला म्हणून लंके यांच्या समर्थकास बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पाथर्डी तालुक्यातच पुन्हा लंके समर्थकास मारहाण झाल्याने विखे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याच्या प्रतिक्रिया लंके समर्थकाकडून येत आहेत.
या मारहाणीसंदर्भात सचिन नारायण हांडे रा. राघुहिवरे, ता. पाथर्डी यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुरूवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास सचिन हांडे हे राघुहिवरे ग्रामपंचायत समोर उभे असताना जबर ज्ञानदेव कुऱ्हे, गोरख शंकर लबडे व दोन अनोळखी इसम हांडे यांच्याजवळ आले. शिविगाळ करत लंके साहेबाचा प्रचार का करतो अशी विचारणा करत तु विखे साहेबाचा प्रचार कर अशी त्यांनी गळ घातली. त्यावर सचिन हांडे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग येऊन गोरख शंकर लबडे याने हांडे यांच्या पोटावर व पाठीवर बेदम मारहाण केली. जबर ज्ञानदेव कुऱ्हे याने हांडे यांच्या उजव्या हाताच्या करंगळीवर ब्लेडने मारले. इतर दोघा अनोळखी इसमांनी हांडे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लाथा बुक्क्यांनी मारहाण मारहाण सुरू असताना हांडे हे जमीनीवर पडल्यानंतर ज्ञानदेव कुऱ्हे याने हांडे यांच्या खिशातील पॅन्टच्या उजव्या खिशातील ९ हजार रूपयांची रोकड काढून घेतली.मारहाणीनंतर सर्व आरोपी पसार झाले.
▪️चौकट
ज्ञानदेव कुऱ्हे व इतरांनी मारहाण केल्यानंतर जाताना तु पुन्हा लंके साहेबाचा प्रचार केला तर तुझ्यावर छेडखानीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी अरोपींनी दिल्याचे हांडे यांच्या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
▪️चौकट
खा. डॉ. सुजय विखे यांचा अंगरक्षक गौरव सुधाकर गर्जे याने शहादेव पालवे यांना बेदम मारहाण केल्याची घटना ताजी आहे. शहादेव हे नीलेश लंके यांच्या स्वाभीमान जनसंवाद यात्रेत सहभागी झाल्याच्या रागातून गौरव गर्जे याने शहादेव यांना सहकाऱ्यांच्या मदतीने मारहाण केली होती. शहादेव यांना मारहाण झाल्यानंतर पोलीस फिर्यादही दाखल करूण घेण्यास तयार नव्हते. शहादेव यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर फिर्याद दाखल झाली. नंतर पोलीसांकडून फिर्यादीची प्रत देण्यासही टाळाटाळ करण्यात आली. अखेर न्यायालयात दाद मागण्यात आल्यानंतर फिर्यादीची प्रत फिर्यादीस पोलीसांकडून देण्यात आली.
▪️चौकट
पाथर्डीमध्ये लंके समर्थकांना लागोपाठ दोनदा मारहाण झाली. एकीकडे राधाकृष्ण विखे, खा. डॉ. सुजय विखे हे मतदारसंघात गुंडा गर्दी माजल्याचा आरोप करतात, दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते आमच्या सर्वसामान्य सहका-यांना बेदम मारहाण करून दहशत निर्माण करत आहेत. सत्ता तुमच्याकडे, याच सत्तेच्या जोरावर, तुमच्या पाठबळावर तुमचे कार्यकर्ते आमच्या सामान्य कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करत आहेेत. मतदार मतपेटीतून त्याचे चोख उत्तर देतील.
- Advertisement -