अंमळनेर प्रतिनिधी – सुनिल आढाव
पाटोदा तालुक्यातील पारनेरमध्ये शनिवारी रात्री जमावाने केलेल्या पारधी वस्तीवर हल्ल्यात सिध्दांत अरुण काळे या एक वर्षीय चिमुरड्याचा बळी गेला होता व इतरांवर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरु असतांना यातील आजिनाथ पिंजिऱ्या काळे वय ७० यांचे देखील सोमवारी निधन झालेले असल्यामुळे पारनेरमध्ये जमावाने केलेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत दोन बळी गेलेले आहेत यामुळे पारनेरमध्ये परिस्थिती तणाव पुर्ण निर्माण झाली आहे .
पारनेरमध्ये दोन बळी गेलेले असल्यामुळे परिस्थिती तणाव पुर्ण बनली आहे यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधिक्षक आर .राजा घटनेची बारकाईने माहिती घेत आहेत सोमवारी पारनेर या घटनास्थळी ठिकाणी जिल्हा पोलीस अधिक्षक राजा रामा स्वामी ,अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार ,यांनी देखील भेट देऊन परिस्थितीचे गांभीर्य जाणुन घेतले .
पारनेरमध्ये डीवायएसपी विजय लगारे ,पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील ,एपीआय धरणीधर कोळेकर ,पीएसआय पठाण ,पोलीस कर्मचारी बाळू सानप ,सुनिल सोनवणे ,बळीराम काथखडे ,तांबे , टेकाळे ,गुरसाळे ,डोके ,क्षीरसागर ,कनाके सह आदी जण हे तळ ठोकून आहेत पारनेरमध्ये परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक यांनी पारनेर या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे .
पारनेरमध्ये पारधी कुटुंबावर केलेल्या हल्ल्यात भिवराबाई काळे ,सगुना काळे ,बबिता भोसले ,करिना चव्हाण ,विद्या भोसले ,हे गंभीर जखमी झालेले असल्यामुळे त्यांच्या वर बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत .
पारनेरमध्ये जमावाने केलेल्या हल्ल्यात एक बालक व एका पुरुषाला आपले प्राण गमवावे लागले आहेत पारधी वस्तीवर केलेल्या हल्ल्यातील सात जणांना तात्काळ गजाआड करण्यात आले हल्ला करण्यात सहभाग असणाऱ्या उर्वरित लोकांना गजाआड करण्यासाठी पोलीस पथके देखील रवाना करण्यात आलेली असल्याची माहिती पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील यांनी दिली .
पारनेरमध्ये जमावाने केलेल्या हल्ल्यात एका मुलीवर देखील अत्याचार केलेला असल्याचे बोलले जात असल्यामुळे पोलीस प्रशासन त्या दिशेने देखील तपास करत आहे यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढण्याची दाट शक्यता आहे ?
पाटोदा पोलिसांची तत्परता आली कामी
पारनेरमध्ये घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील ,एपीआय धरणीधर कोळेकर ,पीएसआय पठाण हे तात्काळ आपला फौजफाटा घेऊन दाखल झाल्यामुळे जमावातील सात जणांना गजाआड करण्यास यश मिळाले जर पोलीस उशिरा घटनास्थळी पोहचले असते तर जमावाने आणखी काय केले असते याची कल्पना न केलेलीच बरी.