घटनास्थळी डीवायएसपी विजय लगारे ,पीआय मनिष पाटील ,एपीआय कोळेकर यांची तात्काळ धाव .
अंमळनेर प्रतिनिधी – सुनील आढाव
पाटोदा तालुक्यातील पारनेरमध्ये शनिवारी रात्री अकराव्या सुमारास गावकरी मोठ्या प्रमाणात एकत्र येत त्यांनी पारधी वस्तीवर केलेल्या हल्ल्यात एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे या घटनेने पाटोदा तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन मयत झालेल्या बालकाचे नाव हे सिध्दांत अरुण काळे वय वर्षे एक असे आहे जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पारधी वस्तीवरील नागरीकांना पाटोदा पोलिसांनीच दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते.
पारनेरमध्ये पारधी वस्तीवर जमावाने हल्ला केल्याची माहिती पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती त्यांच्या सोबत एपीआय धरणीधर कोळेकर ,पीएसआय पठाण ,पोलीस नाईक सुनिल सोनवणे ,शिपाई तांबे पोलीस नाईक गुरसाळे ,पोलीस कर्मचारी बाळु सानप ,बळीराम काथखडे ,कनके ,डोके ,सह आदी जण होते या घटनेची माहिती पीआय मनिष पाटील यांनी डीवायएसपी विजय लगारे यांना देताच त्यांनी देखील घटनास्थळाला तातडीने भेट देऊन घटनास्थळी बारकाईने पहाणी केली .
पारनेर येथील पारध्यांच्या नित्यनेमाने होणाऱ्या कटकटीला व वादावादीला ग्रामस्थ पुरते वैतागून गेले होते यामुळे शनिवारी रात्री जमावाने आक्रमक हल्ला केला यात त्यांनी पारध्यांची घरे देखील पेटवून दिली यात पारध्यांचे संसार उपयोगी साहित्य देखील जळून खाक झाले .
भिवराबाई अभिमान काळे वय 65 वर्षे रा.पारनेर ता.पाटोदा यांच्या फिर्यादी वरुन पारनेर येथील बबन औटे ,बाळु बबन औटे ,बबन कचरु औटे ,विनोद कचरु औटे ,आशोक लक्षण दहिवले ,विष्णू औटे ,युवराज औटे ,विशाल औटे यांच्या सह इतर दहा ते बारा जणांवर पाटोदा पोलीस ठाण्यात कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात भिवराबाई अभिमान काळे वय 65 वर्षे , अभिमान काळे वय 70 वर्षे ,सगुना अरुण काळे ,ताराबाई पुर्ण नाव नाही ,विद्या साईनाथ भोसले हे जखमी झालेले असुन यात अभिमान काळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते या हल्ल्यात मात्र यांना सिध्दांत अरुण काळे वय एक वर्षे या बालकाला आपला जिव गमवावा लागला .
यातील पारधी वस्तीवरी जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील आरोपींना पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील यांनी तात्काळ गजाआड देखील केलेले आहे तर उर्वरीत आरोपींचा शोधासाठी पोलिसांचे पथक देखील रवाना झालेले आहे .कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून डीवायएसपी विजय लगारे हे दिवसभर पाटोद्यात तळ ठोकून होते .
या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे करत आहेत तर त्यांना तपासकामी मदत पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील ,एपीआय धरणीधर कोळेकर ,पीएसआय पठाण हे करत आहेत .पारनेरमध्ये सध्या देखील पाटोदा पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केलेला
————————–
पारनेरमध्ये जमावाने केलेल्या हल्ल्यात एक वर्षाच्या बालकाचे निधन झाले आहे हल्ला करणाऱ्या जमावातील सात जणांना गजाआड करण्यास यश आले आहे उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके देखील रवाना करण्यात आली असल्याची माहिती पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील यांनी दिली .
———–
पारनेरमध्ये जमावाने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पारधी वस्तीवरील नागरीकांना उपचारासाठी पाटोदा येथील रुग्णालयात पाटोदा पोलीसच वाहनातून घेऊन केले सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत यात मात्र एक जणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते .