घटनास्थळी डीवायएसपी विजय लगारे, पीआय मनिष पाटील ,एपीआय कोळेकर यांचे बारकाईने लक्ष
अंमळनेर प्रतिनिधी – सुनिल आढाव
पाटोदा तालुक्यातील पारनेरमध्ये शनिवारी रात्री जमावाच्या हल्ल्यात दोन बळी केल्यानंतर एका महिलेला देखील बुधवारी प्राथमिक उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे उपचारासाठी औरंगाबादला हलवलेल्या महिलेचे नाव हे भिवराबाई अभिमान काळे रा.पारनेर असे आहे .
पारनेरमध्ये जमावाच्या हल्ल्यात दोन बळी गेलेले सिध्दांत काळे व अभिमान काळे अशी त्यांची नावे आहेत .सध्या पारनेरमध्ये पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर ,पीएसआय पठाण हे बारकाईने माहिती घेत सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस कर्मचारी हे देखील पारनेरमध्ये चोवीस तास तळ ठोकून आहेत तर उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे देखील पाटोदा पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत .
पारनेरमध्ये पारधी वस्तीवर पाटोदा पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केलेला आहे यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे सध्या पारनेरमध्ये परिस्थिती गंभीर नसली तरी पारधी वस्तीवर येणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पाटोदा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे .
पारनेरमध्ये हल्ला करणाऱ्या जमावातील नागरीकांना पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील ,एपीआय धरणीधर कोळेकर ,पीएसआय पठाण व पोलीस कर्मचाऱ्यांनी गजाआड केलेले आहे उर्वरित काही आरोपींना पोलिसांनी चौकशी कामी ताब्यात घेण्यात आलेले आहे .
———–
पारनेरमध्ये पारधी वस्तीवर हल्ला करणाऱ्या जमावातील काहींना आगोदरच गजाआड केलेले आहे तर काहींना रात्रीच उचलण्यात आलेले आहे यामुळे लवकरच यातील पुर्ण आरोपी गजाआड करण्यात येणार असल्याचा विश्वास पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील यांनी व्यक्त केला.
——————–
पारनेरमध्ये जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन बळी गेलेले असल्यामुळे डीवायएसपी विजय लगारे हे तिन दिवसांपासून पाटोदा पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत .