पावसाळा सुरू होताच केडगावमध्ये विजेचा लपंडाव

- Advertisement -

पावसाळा सुरू होताच केडगावमध्ये विजेचा लपंडाव

एमएससीबीने नागरिकांच्या तक्रारीचे तातडीने निराकरण करावे – माजी सभापती मनोज कोतकर

नगर : पावसाळा सुरू झाला असून एमएसईबीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे केडगावमध्ये गेल्या पाच दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे एम एस ई बी च्या विरोधात नागरिकांचा रोष वाढत चालला आहे, रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होऊन रात्रभर वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही .

नागरिकांनी केलेले फोन उचलले जात नाही, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण होत नाही तरी नागरिकांचे फोन उचलून तातडीने तक्रारीचे निराकरण करावे ताराबाग कॉलनी, हनुमान नगर, देवीरोड, दूध सागर सोसायटी, मोहिनी नगर, व केडगाव परिसरामध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे, काही ठिकाणी पोलवरील तारा लोंबकळल्या असून त्यांची दुरुस्ती तातडीने करावी अन्यथा एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी एम एस ई बी ने नागरिकांचे विजेचे प्रश्न तातडीने सोडावे अशी मागणी केडगाव विभागाचे अधिकारी दत्तात्रेय दसपुते यांच्याकडे स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी केली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!