३० वर्षांपासूनची संस्थेवर वर्चस्व
माजी पंचायत समिती उपसभापती अंकुशराव ढवळे पिंपरखेडचे हॅटट्रिक सरपंच पराभूत
– – – – – – – – – –
जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण
पिंपरखेड सेवा संस्थेच्या निवडणुकीत पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांच्या जनसेवा शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला.
या निवडणुकीत विरोधकांनी धनशक्तीचा वापर केला पण तीस वर्षांच्या कामामुळे शेतकरी सभासदांनी जनशक्तीचे सर्व तेरा उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले असे पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे म्हणाले.या निवडणुकीत पिंपरखेडचे हॅटट्रिक सरपंच बापूराव ढवळे यांचा व पॅनेलचा दारूण पराभव झाला.
पिंपरखेड सेवा संस्थेची निवडणूक गुरवार रोजी झाली.या निवडणुकीत ९० टक्के मतदान झाले व त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांच्या मंडळाने जनसेवा शेतकरी विकास पॅनेलने सुरवातीपासून आघाडी घेऊन ती कायमस्वरूपी टिकवून दणदणीत विजय मिळविला.
पिंपरखेड ग्रामपंचायतचे हॅटट्रिक सरपंच व भाजप तालुका उपाध्यक्ष बापूराव ढवळे हे स्वताहा पराभूत झाले तसेच सर्व पॅनेलचा दारूण पराभव झाला.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
१) पांडुरंग विठ्ठल ढवळे ४४५
2) भगवान आप्पा ओमासे ४४३
3)आनंदराव सुभेदार भापकर ४३४
४) दगडू आंबादास कदम ४३१
५) शिवाजी मथुरदास ढवळे ४३१
६) मोहन रंगनाथ शिंदे ४१५
७) रहीमान महेबूब शेख ४१४
८) दगडू आंबादास कदम ४३४
९)दगडाबाई नवनाथ ढवळे ४७१
१०) गजराबाई सुदाम लबडे ४४६
११) करीश्मा रवींद्र रोही ४५७
१२) संभाजी ज्ञानदेव कारंडे ४७५
१३) संभाजी तानाजी सातपुते ४६०
निवडणूक निर्णय अधिकारी देवीदास घोडेचोर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश मुंडे यांनी काम पाहिले.