वयोश्री योजना ही खऱ्या अर्थाने वयवृद्धांसाठी हिताची आहे : खासदार सुजय विखे पाटील
अहमदनगर प्रतिनिधी :- लहू दळवी
ज्येष्ठांच्या आरोग्य अबाधित राहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साठ वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना सुरु करुन खर्या अर्थाने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या हिताची गोष्ट केली आहे. केंद्र सरकारची कुठलीही योजना कागदावर न राहता जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. आपण स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत.
सध्याच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरोग्य सेवा आहे. कोरोनाच्या महा भयंकर संकटाला आपण सर्वजण सामोरे गेलो आहोत. केंद्र सरकारने आपले सर्वांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मोफत लसीकरण सुरू करण्याचे काम केले आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना ही समाजाप्रती अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपाद खासदार सुजय विखे यांनी केले.
पिंपळगाव माळवी (ता नगर) येथे आपल्या देशाचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या 75व्या अमृत महोत्सव निमित्त राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू करुन ६० वर्षावरील सर्व नागरिकांसाठी व डॉ विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा अपंग (दिव्याग)पुनर्वसन केंद्र अहमदनगर,व जिल्हा कल्याण समाज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत”मोफत सहायक साधने वाटपासाठी तपासणी शिबिराचे उदघाटन खासदार डॉ सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाशी घिगे, संतोष म्हस्के , दिलीप भालसिंग,रेवन नाथ चोथे , हरीभाऊ कर्डीले, संतोष कुलट ,सभापती सुरेशराव सुबे, जालिंदर कदम, बापूसाहेब बेरड,विश्वनाथ गुंड, सरपंच राधिका प्रभूंने, उपसरपंच भारती बनकर,प्रा देवराम शिंदे,कचरू सोनार,सुधीर गायकवाड , गटविकास अधिकारी रेश्मा हो जगे पदाधिकारी,लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेली राष्ट्रीय वयोश्री योजना ही घरापर्यंत घेऊन जाण्याचे काम खासदार सुजय विखे पाटील करत आहे. वयोवृद्धांसाठी सुरू असलेली राष्ट्रीय वयोश्री योजना ही कौतुकास्पद आहे. खासदार सुजय विखे पाटील खऱ्या अर्थाने वयोवृद्धांसाठी धावून आले आहेत.
नियोजनपूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वांना या योजनेचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करीत आहे. प्रत्येक वयोवृद्धांची विचारपूस करून त्याच्या आरोग्याची तपासणी केली जाते. त्याच बरोबर त्याला लागणाऱ्या साहित्याचे वाटपही ताबडतोब केले जाते. खासदार सुजय विखे वयोवृद्धांसाठी करीत असलेली काम हे आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्शगाव मांजरसुंबाचे मा.सरपंच जालिंदर कदम यांनी केले व आभार प्रदर्शन विश्वनाथ गुंड यांनी मानले.