पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी त्रिसूत्री जारी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आधुनिक शेतीतंत्र,शेतीमालाला रास्त बाजारभाव आणि गुट्टलबाज पुढार्‍यांविरोधात डिच्चू कावा स्विकारण्याचे आवाहन

शेतकरी एकवटून त्रिसूत्रीचा स्विकार केल्यास क्रांती – अ‍ॅड. गवळी

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरू आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आधुनिक शेतीतंत्र,शेतीमालाला रास्त बाजारभाव आणि गुट्टलबाज पुढार्‍यांविरोधात डिच्चू कावा या त्रिसूत्रीचा स्वीकार करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

लहरी निसर्ग आणि सरकारच्या लहरी धोरणामुळे शेतकर्‍यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे दारिद्रय वाढत चालले असून, परिणामी शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत.

देशातील शेतकर्‍यांसाठी आधुनिक शेती तंत्र, शेतीमालाला रास्त बाजार भाव आणि गुट्टलबाज पुढार्‍यांविरोधात डिच्चू कावा या गोष्टी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात असंघटित आणि अडाणी असल्यामुळे शेतकर्‍यांचे हाल सुरू आहेत.

शेतकर्‍यांनी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करुन केंद्र सरकारला झुकवले.शेतकरी एकवटून त्रिसूत्रीचा स्विकार केल्यास क्रांती होणार आहे. शेतकर्‍यांना संघटित करुन या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्यासाठी ही मोहीम जारी करण्यात आल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी म्हंटले आहे.

प्रत्येक राबणार्‍याला शेतकर्‍याला जगभरातील आधुनिक शेती तंत्र सहज उपलब्ध झाले पाहिजे.त्याचबरोबर शेतकर्‍याची शेती ही व्यापारी शेती होऊन संपत्तीचा ओघ शेतकर्‍यांकडे सुरु झाला पाहिजे.

त्याचबरोबर प्रत्येक शेतकर्‍याने गुट्टलबाज व्यापारी आणि सत्तापेंढार्‍याविरुद्ध जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्राचा वापर केलाच पाहिजे.यासाठी त्रिसूत्री आमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

यासाठी अ‍ॅड.गवळी,अशोक सब्बन,कॉ.बाबा आरगडे, यमनाजी म्हस्के,जालिंदर बोरुडे,पै.नाना डोंगरे,विजय भालसिंग,वीरबहादूर प्रजापती,प्रकाश थोरात,सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे,बाळासाहेब गायकवाड,विठ्ठल सुरम,अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!