पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने मतदार क्रांती घडविण्यासाठी पुढाकार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

वोट माफिया व भ्रष्ट लोकप्रतिनिधींना घरचा रस्ता दाखवून मतदार क्रांती घडविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने राष्ट्रीय मतंसंधारण अभियान जारी करण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मतदाराला प्रजासत्ताक भाग्यविधाता व क्रांती कर्मा घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

देशात सामाजिक आणि आर्थिक विषमता असल्यामुळे बहुसंख्य जनसमुदायाला सामाजिक दर्जा व प्रतिष्ठा मिळत नाही.त्यामुळे मतदानाचे महत्त्वही ते लक्षात घेत नाही.हजार,पाचशे रुपये व दारु,मटनावर अनेक मतदार बळी जातात.त्याचा फायदा वोट माफिया घेतात आणि मागच्या दाराने सत्ता काबीज करतात.प्रत्येक मतदार हा देशाचा भाग्यविधाता म्हणजेच कर्ता-करविता असल्यामुळे याची जाणीव मतदारांना करुन देण्यासाठी राष्ट्रीय मतसंधारण अभियान कार्य करणार आहे.

या अभियानाच्या माध्यमातून वोट माफिया व भ्रष्ट लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्यासाठी मतदारांना डिच्चू कावा तंत्राचा वापर करण्याचे आवाहन केले जाणार आहे.आज देशाची आर्थिक आणि इतर क्षेत्रातील प्रगती ठप्प होण्याचे कारण होईल ते होऊ दे मला काय त्याचे? ही ढब्बू मकात्या प्रवृत्ती आहे.यामुळे सर्व मी आणि माझे कुटुंब यामध्ये गुंतलेले आहेत.

या अभियानात नज थेरीचा वापर करून मतदाराला चुकलेल्या रस्त्यावरून देश कल्याणाच्या मार्गावरील नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रीय मतंसंधारण अभियानातून नागरिकांना आपण यापूर्वी केलेल्या चुकांमुळे देशाचे आणि समाजाचे कसे नुकसान झाले? याची जाणीव होईल.तर आपले मत किती महत्वाचे आहे आणि त्यातून देशात क्रांती घडू शकत असल्याची जाणीव मतदारांना झाल्याशिवाय राहणार नाही.

आपले मत वोट माफिया,दारू कोंबडी किंवा पैसे देऊन मागच्या दाराने सत्ता मिळवणार्‍यांच्या विरोधात वापरले जाऊ शकते.याची जाण मतदारांना येण्याची गरज आहे.आपले मत राष्ट्र उभारणीसाठी आणि चांगल्या उमेदवारांच्या पदरात देण्यासाठी घराघरात पर्यंत ही मोहिम घेऊन जाण्यात येणार असल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी म्हंटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!