पेढे वाटून व कन्यारत्न झालेल्या मातेच्या सत्काराने स्त्री जन्माचे स्वागत

0
92

डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम

कुटुंबासह समाज प्रकाशित करणारी मुलगी वंशाची पणती – पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था,श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले.निमगाव वाघा येथील मयुरी सचिन जाधव यांना नुकतेच कन्यारत्न झाले.

कापुरवाडी येथे माहेरी असलेल्या या महिलेच्या घरी जाऊन मातेचा सत्कार करुन मुलीला कपड्यांची भेट व पेढे वाटून डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी स्त्री जन्माचे स्वागत केले.यावेळी ह.भ.प. आप्पासाहेब वाळुंजकर,अनिता वाळुंजकर उपस्थित होत्या.

पै.नाना डोंगरे म्हणाले की, मुलींनी सर्व क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.जी स्त्री प्रत्येक क्षेत्रात अव्वल ठरत असताना आज तिच्या जन्मावरच गदा येत आहे.कुटुंबासह समाज प्रकाशित करणारी मुलगी वंशाची पणती आहे.

स्त्री भ्रुण हत्या रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्त्री आई,बहिण,पत्नी,मैत्रिण अशा विविध रुपात असते.मुलगी जगल्यास व शिकल्यास समाजाची प्रगती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here