पोदार इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावी बोर्डाचा 100 टक्के निकाल
अनेक विद्यार्थी उच्च श्रेणीने उत्तार्ण
96 टक्के गुण मिळवून अनुष्का पांडे शाळेत प्रथम
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पोदर इंटरनॅशनल स्कूल (अहमदनगर) सीबीएसई बोर्डाचा सन 2023-24 या वर्षातील इयत्ता दहावी बोर्डाचा निकाल 100 टक्के लागला. शाळेतील अनुष्का पांडे 96 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, तर श्रेयस विजय पवार याने 95.4 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला. अनुष्का सुनील सांगळे व यश मिलिंद ठोंबरे या दोघांनी 93.6 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. तसेच धनश्री प्रदीप तांदळे 93.2 टक्के, आर्या राजेंद्र शिंदे 91.6 टक्के, दिव्यल अमित भांड 91 टक्के गुण मिळवून यश संपादन केले.
अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजी, विज्ञान, गणित, समाजशास्त्र, संगणक या सर्व विषयांमध्ये 90% च्या वर गुण मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप यांनी अभिनंदन केले व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य जगताप, उपप्राचार्य शगुफ्ता काझी, शाळेचे ॲडमिन ऑफिसर आशुतोष नामदेव व शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
प्राचार्य मंगेश जगताप म्हणाले की, दहावी बोर्डाची परीक्षा ही तुमच्या आयुष्यातील परीक्षेचा पहिला टप्पा आहे. तुमचे जे ध्येय आहे, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हांला अनेक परीक्षांना सामोरे जायचे आहे. आता इथून पुढे खऱ्या अर्थात तुमचे आयुष्य सुरू होईल. आयुष्याचे नवे धडे गिरवण्यासाठी आता तुम्हाला तयार व्हायचे आहे. अनेक नवनवीन आव्हानांना सामोरे जाताना शाळेतून मिळालेले शिक्षकांचे मार्गदर्शन, संस्कार नेहमीच उपयोगी पडतील, असे त्यांनी सांगितले.