पोलिस रेझिंग डे निमित्त स्नेहबंधच्या वतीने निबंध स्पर्धा

0
88

अहमदनगर प्रतिनिधी – नगर येथील स्नेहबंध सोशल फाउंडेशन च्या वतीने पोलिस रेझिंग डे (स्थापना दिन) निमित्त नगर शहराकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी दिली.

१ ते ७ जानेवारी हा सप्ताह पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो.

निबंध स्पर्धेसाठी
* पोलीस माझा अभिमान.
* जर पोलीस नसते तर.
* मी पोलीस बोलतोय..

असे विषय आहेत. निबंध शब्द मर्यादा जातीत जास्त १००० शब्दांपर्यंत असावी. निबंध स्वतः लिहिलेला असावा. निबंधाच्या मागील बाजूस पूर्ण नाव,पत्ता तसेच मोबाईल क्रमांक लिहिलेला असावा.निबंध स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके काढण्यात येतील.

विजेत्या स्पर्धकांना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल.

निबंध 25 डिसेंबर पर्यंत पियुष फोटो & व्हीडिओ, 1063, शिवाजी चौक, भिंगार, अहमदनगर- 414002 या पत्त्यावर स्वतः किंवा पोस्टाने / कुरिअर ने पाठवायचे आहेत. अधिक माहिती साठी 8793191919 या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेत प्रवेश मोफत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here