नेवासा प्रतिनिधी – कमलेश गायकवाड
जिल्हा पोलीस दलाच्या तपासणीकामी आलेल्या
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर यांचा नेवासा तालुक्यातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
कर्तव्यदक्ष तितकेच न्यायप्रिय म्हणून सुपरिचित असलेले नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी नुकतीच नेवासा पोलीस ठाण्याला भेट देऊन पाहणी केली.
सात दिवसांच्या त्यांच्या जिल्हा पोलीस दलाच्या तपासणी मोहिमेअंतर्गत त्यांनी नेवासा पोलीस ठाण्याच्या कारभारासह इतरही बारीक सारीक गोष्टींची पाहणी केली.
यावेळी त्यांचा केंद्रीय पत्रकार संघ तसेच अहमदनगर जिल्हा काँग्रेस (एस.सी.विभाग)च्या वतीने
जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड,जिल्हा सरचिटणीस सुदाम कदम,नेवासा काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन जाधव यांनी श्री ज्ञानेश्वर ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.
श्री.शेखर यांच्या तपासणी दौऱ्यानिमित्ताने जिल्हा पोलीस दलात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. लोकाभिमुख अधिकारी म्हणून लौकीक असलेल्या श्री.शेखर यांच्या दौऱ्यानिमित्त एक महिन्यापासून जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची लगबग पाहायला मिळत होती.
यानिमित्ताने श्री.शेखर यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेटी देऊन कामकाजाची बारकाईने पाहणी केली. तसेच अवैध धंदे, गुन्हेगारीवर वचक ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोलाच्या सूचना केल्या.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, तसेच पोलीस उपाधिक्षक सुदर्शन मुंडे यांचे पोलीस दलावरील नियंत्रण आणि लोकाभिमुख कार्यप्रणालीचे श्री.शेखर यांनी यावेळी विशेष कौतुक केले.
याप्रसंगी शेवगाव, नेवासा, शनिशिंगणापूर, सोनई पोलीस ठाण्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
‘ते आले, त्यांनी पाहिले,त्यांनी जिंकले’ –
कर्तव्यकठोर तसेच न्यायप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी त्यांच्या तपासणी दौऱ्या दरम्यान पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना तणावमुक्त ठेवण्यावर मुख्य
भर दिल्याचे दिसून आले.विविध पोलीस ठाण्यांच्या कामकाज तपासणी दरम्यान त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी, सुविधांचीही यावेळी पाहणी केली.
नेवाशात तर त्यांनी अधिकारी,कर्मचाऱ्यांसाठी वापरात असलेल्या स्वच्छतागृहांचीही थेट आतमध्ये जाऊन पाहणी केल्याचे दिसून आले.लोकाभिमुख कारभाराबरोबरच कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना चांगलीच जाण असल्याचे पाहून वातावरण भारावून गेले नसेल तरच नवल.श्री.शेखऱ यांच्या या दौऱ्याचे वर्णन, ‘ते आले, त्यांनी पाहिले, त्यांनी जिंकले’ असे केले तर ते वावगे ठरु नये.