हाडांची ठिसूळता तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर
सकल माळी समाज (ट्रस्ट) कार्य हे समाजातील तळागाळातील जनते साठी कसे करता येईल.याचे उत्तम उदाहरण म्हणजे हाडांची ठिसूळता तपासणी शिबीर होय.या शिबिरासाठी डॉ.रणजित सत्रे यांचे महत्व पूर्ण योगदान आहेच. समाजातील मान्यवरांचा वाढदिवस साजरा करणे,त्यांना शुभेच्छा देणे,म्हणजेच सामाजिक कार्य न समजता समाजातील जनतेचे आरोग्यावर पण काम कसे करता येईल.याचे आज प्रत्यक्ष फलित दिसले.डॉ.रणजित सत्रे यांनी सामाजिक कार्याने वाढदिवस साजरा केला.ही समाजासाठी भूषणावह बाब आहे.असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.
अ.नगर सकल माळी समाज ट्रस्ट व प्रिसिजन प्लस डायग्नोस्टिक सेंटरच्या संयुक्त विद्यमाने हाडांची ठिसूळता तपासणी शिबिर घेण्यात आले.याप्रसंगी डॉ. रणजीत सत्रे,डॉ.सुशील नेमाणे,अ.नगर सकल माळी समाज (ट्रस्ट) चे बाळासाहेब भुजबळ ,राजेंद्र पडोळे, सौ.पडोळे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे,हभप रामदास कानडे,कॅप्टन सुधीर पुंड, सौ.पुंड,प्रकाश इवळे,रमेश इवळे,अरुण गाडळकर,अमोल भांबरकर आदी उपस्थित होते.
डॉ.रणजीत सत्रे म्हणाले,वयाच्या चाळीशी नंतर प्रत्येकाने हाडांची ठिसूळता तपासणी करणे आवश्यक आहे.हाडांची ठिसूळता होणे प्राथमिक स्टेजला असल्यास उत्तम आहार व योग्य व्यायामामुळे हाडांची बळकटी वाढवण्यास मदत होते. वेळीच उपचार घेतल्याने भविष्यातील धोका टाळता येतो.