अहमदनगर प्रतिनिधी – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील टिळक भवनात आयोजित केला आहे. या सोहळ्यात नूतन प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह अन्य पदाधिकारी पदग्रहण करणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मागील आठवड्यामध्ये प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे.त्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची निवड झाली आहे. या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता टिळक भवन येथे होत आहे.
काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष व प्रदेश काँग्रेस कमिटीचे विद्यमान उपाध्यक्ष श्री.विजय अंभोरे यांच्याकडून सिद्धार्थ हत्तीअंबिरे प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार घेणार आहेत.
या सोहळ्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे प्रदेश समन्वयक शिवाजी राजे जगताप , तसेच प्रदेश समन्वयक बंटी यादव, जिल्हा समन्वयक गावित्रे, जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी सांगितले.