प्रधानमंत्री आवास योजना अधिक वेगाने राबवा – खासदार डॉ.सुजय विखे पाटील

0
103

अहमदनगर प्रतिनिधी – प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत येणाऱ्या घरकुल योजनेच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून पात्र लाभार्थ्यांना आपल्या हक्काचा निवारा मिळेल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी असे निर्देश खासदार डॉ सुजय विखे पाटील ह्यांनी दिले. अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील नालेगाव,आगरकर मळा, केडगाव, संजय नगर ,येथील प्रलंबित असलेल्या प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक अहमदनगर महानगरपालिकेच्या कार्यालयात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर रोहिणी ताई शेंडगे,उपमहापौर गणेश भोसले, स्थायी सभापती अविनाश घुले, मा.नगरसेवक निखील वारे,मा. नगरसेवक धनंजय जाधव,सचिन जाधव ,आयुक्त शंकर गोरे, तसेच अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्काचे घरकुल मिळावे ह्या साठी पंतप्रधान मोदी ह्यांनी प्रधानमंत्री आवास योजने ची आखणी केली आहे. योजनेचा संदर्भात निधी उपलब्धता तसेच येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात आपण म्हाडा ऑफिस, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले, त्यामुळे आपल्या अधिकार क्षेत्रातील अडचणी प्रशासनाने तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, ज्या अडचणी संदर्भात शासन दरबारी प्रयत्न करायचा आहे त्या बाबत आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here