प्रभाग क्रमांक एक मध्ये मिशन कवच कुंडल लसीकरणाच्या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद

0
78

लसीकरणाची मिशन कवच कुंडल मोहिमेअंतर्गत नगर कोरोणा मुक्त करू: डॉ सागर बोरुडे

अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी

शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड प्रतिबंधक लसीकरणाची मिशन कवच कुंडल अभियान राबवित असून मतदार यादीनुसार घरोघरी लसीकरण मोहीम सुरू केली आहे.या माध्यमातून शहरातील अठरा वर्षापुढील नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण करून नगर शहर कोरोना मुक्त करायचे आहे.

आपल्या सर्वांना तिसऱ्याला लाटेला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. आत्तापर्यंत शहरातील ७२ टक्के नागरिकांचे लसीकरणचा पहिला डोस पूर्ण झाला आहे.तरीही दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी मिशन कवच कुंडल मोहीम यशस्वीपणे मनपा व आरोग्य समिती राबवित असल्याचे प्रतिपादन डॉक्टर सागर बोरुडे यांनी केले.

नागापूर आरोग्य केंद्राअंतर्गत प्रभाग क्रमांक एक व सात मधील नागरिकांचे मिशन कवच-कुंडल अभियानांतर्गत लसीकरणाची मोहीम सुरू आहे.

यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ सागर बोरुडे, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर,नगरसेविक मिना ताई चव्हाण, नगरसेविका दीपाली ताई बारस्कर, आरोग्य अधिकारी डॉ सतीश राजूरकर, रंजना उकिरडे, मीरा बारस्कर, किसन कजबे, सागर गुंड, रोहित शर्मा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

डॉ. सतीश राजूरकर म्हणाले की मिशन कवच-कुंडल मनपाने हाती घेतल्यामुळे नागरिकांचे घरोघरी जाऊन लसीकरण करणे शक्य झाले आहे. नागरिकांची लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी युदध पातळीवर कर्मचारी काम करीत आहे.पुढील पाच दिवसांमध्ये मतदार यादी नुसार सर्व भागांमध्ये जाऊन लसीकरण मोहीम सुरू झाली आहे.

नागरिकांनी लसीकरणासाठी सहकार्य करावे जेणेकरून नगर शहर कोरोना मुकती वाटचाल करेल व नागरिकांचे आरोग्य आबाधित राहण्यास मदत होईल असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here