देशमुख वाडी तील रस्ता शहरांमध्ये मॉडेल रस्ता मधून ओळखला जाईल
दर्जेदार विकास कामे हाच अजंठा : माजी उपमहापौर मालन ताई ढोणे.
अहमदनगर प्रतिनिधी : मनपा प्रभाग क्रमांक 9 मध्ये विविध विकास कामे सुरू आहे. प्रभागाच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर केला असल्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्व विकास कामे मार्गी लागतील. सर्जेपुरा ते दिल्लीगेट रस्त्याला जोडणारा देशमुख वाडी तील रस्ता हा शहरांमध्ये मॉडेल रस्ता मधून ओळखला जाईल या रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाले आहे.

झेडपी कॉलनीतील नाल्यावर पुलाचे कामही मार्गी लावून कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. अशीच विकास कामे शहरांमध्ये दर्जेदार व्हावी जेणेकरून पुन्हा पुन्हा रस्त्यांची कामे करण्याची गरज पडणार नाही. सर्वांनी मिळून शहर विकासाला चालना द्यावी असे प्रतिपादन माजी उपमहापौर मालन ताई ढोणे यांनी केले.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये माजी उपमहापौर मालन ताई ढोणे यांच्या प्रयत्नातून देशमुख वाडी येथील रस्ता डांबरीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी माजी नगरसेवक दिप चव्हाण, नगरसेवक प्रदीप भैय्या परदेशी, सचिन पारखी,अजय ढोणे ,संजय ढोणे,शहर अभियंता सुरेश इथापे, इंजिनीयर श्रीकांत लिंबाळकर,चेतन जग्गी, स्वप्निल लाहोर, भारत ढोणे, अनिकेत ढोणे, रोहन चेगडिया, मंजू झालानी, संतोष खंडेलवाल, दीपक राजपूत, अंजली महाजन, हेमंत दंडवते, सुभाष राणा, दीपक राजपूत, विजय वडागळे, नमन झालानी, शुभम खंडेलवाल, अनिता खंडेलवालआदी उपस्थित होते.
माजी उपमहापौर मालन ताई ढोणे पुढे म्हणाले की नागरिकांना विश्वासात घेऊन विकास कामे केलेस दर्जेदार कामे होण्यास मदत होत असते. विकास कामे सुरू असताना नागरिकांनी कामावर लक्ष केंद्रित करावे प्रभाग क्रमांक ९ चा सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले.