प्रभाग क्र.११ कोठी भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी. 

0
89

नगरसेविका रुपाली पारगे (कदम) यांच्या पाठपुराव्याला यश.

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या महापालिका हद्दीतील प्रभाग क्र.११ मधील कोठी परिसर येथील मकासरे चाल, मस्के चाल, यमुना सदन, इंदिरानगर, अरिहंत कॉलनी, चैतन्य कॉलनी व संपूर्ण कोठी परिसर येथे मागील २ ते ३ महिन्यापासून या भागांमध्ये जेव्हा पाणी येते तेव्हा नळाला अत्यंत कमी दाबाने १५ ते २० मिनिटे पाणी राहते.काही घरांना तर गेल्या अनेक दिवसापासून पाणीच आले नाही.

प्रलंबित असलेल्या नागरिकांचं पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांनी नगरसेविका रूपाली पारगे कदम यांची भेट घेऊन समस्या मांडली असता त्वरित प्रश्न सोडविण्याची मागणी केली असता.नगरसेविका रूपाली पारगे (कदम) यांनी वॉलमॅन,इंजिनियर ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा केला व आमदार संग्राम जगताप व उपमहापौर गणेश भोसले यांच्याकडे पाठपुरावा केला.

प्रभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावून परिसरामध्ये ज्या ठिकाणी कमी दाबाने पाणी येत होते. त्या ठिकाणी वॉल बसून नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबदल नागरिकांनी नगरसेविका रूपाली पारगे (कदम), माजी. नगरसेवक विनोद कदम, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, जोसेफ पारगे याचे आभार मानले.यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here