विकासाची दर्जेदार कामे हाच अजंठा – आ.संग्राम जगताप- Advertisement -
अहमदनगर प्रतिनिधी – आता पावसाळा संपला आहे शहरातील रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून जमिनी अंतर्गत पाणी व ड्रेनेजचे सर्व कामे मार्गी लावून रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरणाची कामे सुरू केली आहे.ही विकासाची दर्जेदार कामे हाच आमचा अजंठा आहे.अनेक वर्षापासून प्रलंबित कामे नियोजनबद्ध व कायमस्वरूपी मार्गी लावत आहे.
उपमहापौर गणेश भोसले यांच्या कामाचा आदर्श इतरांनी घेऊन शहरामध्ये दर्जेदार विकास कामे उभी करावी जेणे करून शहर विकासाला चालना मिळणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग क्र.१४ मध्ये उपमहापौर गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, मा.नगरसेवक संजय चोपडा व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमहापौर गणेश भोसले म्हणले की,प्रभागाच्या विकासाबरोबरच शहराच्या विकासाला प्राधान्यक्रम दिला असून नियोजनबद्ध विकासकामे करायची आहे.ती कामे पुन्हा-पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येत नाही.
आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाला गती मिळणार आहे आय.टी.आय कॉलेज समोरील रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे कामे सुरू केले आहेत. प्रभागांमध्ये विविध कामांसाठी निधी मंजूर असून ही कामे टप्प्या-टप्प्याने सुरू होतील असे ते म्हणाले.