प्रशांत गायकवाड यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

माथाडी कामगारांसाठी विविधउपक्रम राबवावेत – संभाजी कदम

अहमदनगर प्रतिनिधी – नगरचे रेल्वे स्थानक हे राज्यातील मध्यवर्ती स्थानक असल्याने या ठिकाणाहून मालांची मोठी आवक-जावक होत असते.नगर जिल्ह्यातूनही देशाच्या कानाकोपर्‍यात विविध प्रकारचा माल जात असतो.या मालांची चढ-उतार करण्यासाठी माथाडी कामगार काम करत आहेत.

या कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी युनियन नेहमीच पुढाकार घेत त्यांना त्यांचेहक्क मिळवून देत असते.या युनियनच्या अध्यक्षपदी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांची निवड झाल्याने या पदाच्या माध्यमातून ते माथाडींच्या अडीअडचणी सोडविण्यास प्राधान्य देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्नकरण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत.त्यांच्याकार्यात आमचेही सहकार्य राहील,अशी ग्वाहीशिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली.

अहमदनगर रेल्वे स्टेशन मालधक्का माथाडी कामगार युनियनच्या अध्यक्षपदी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी मधुकर पाटोळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शिवसेनेच्यावतीने माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कुणाल खैरे,बाळू दरेकर,किशोर बेद्रे,आकाश निर्भवणे,प्रशांत हातरुणकर आदि उपस्थित होते.

सत्कारास उत्तर देतांना प्रशांत गायकवाड म्हणाले,रेल्वे मालधक्का येथे मोठ्या प्रमाणात माथाडी काम करत असून,युनियनच्या माध्यमातून एकजूटीतून आपले प्रश्न सोडवत आहेत.सर्वांच्या सहकार्याने आपली युनियनच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही कामगारांचा प्रतिनिधी असून या पदाच्या माध्यमातून कामगारांचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करु.

त्याचप्रमाणे कामगारांसाठी विविधउपक्रम राबविण्यात येतील.यासाठी मित्र परिवारांचे नेहमीप्रमाणे सहकार्य राहील,असे सांगितले.याप्रसंगी उपाध्यक्ष मधुकर पाटोळे, कुणाल खैरे यांनी मनोगत व्यक्त केले.किशोर बेद्रे यांनी आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!