रोजगार हमी योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या कामाचे पैसे,कुशल निधी तात्काळ मिळावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल
अहमदनगर प्रतिनिधी : प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा सचिव महाराष्ट्र राज्य विमलाताई अनारसे, ईश्वर आनारसे, दीपक अनारसे, दत्तात्रय अनारसे, बक्षी देवकाते, विष्णु देवमंडे आदी उपस्थित होते
कर्जत तालुक्यातील रोजगार हमी योजना राबविण्यात आली असून त्यात कृषी विभागा मार्फत २६ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु सदर कामाचे पैसे संबंधित विभागाकडून वर्ग न झाल्यामुळे तालुक्यातील जवळपास ३६७ शेतकरी अडचणीत असून त्यांना संबंधित कुशल निधी तात्काळ मिळावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ११ ऑक्टोबर २०२१ रोजी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
शेतकऱ्यांचे फळबागा, रोपांचे व खतांचे पैसे कर्जत तालुक्यातील व नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर दि. १० ऑक्टोंबर पर्यंत वर्ग केले नाही तर कोणत्याही ठिकाणी तीव्र आंदोलन केले जाईल.