प्राणघातक अग्निशस्त्र कब्जात बाळगुन गुन्हे करण्याचे उद्देशाने क्लेरा ब्रुस मैदान अहमदनगर येथे थांबलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार कोतवाली पोलीसांनी केला जेरबंद
दि. 04/04/2024 रोजी 14.00 वा. चे सुमारास क्लेरा ब्रूस मैदान, अहमदनगर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे विरजु जाधव हा काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने कमरेला अग्निशस्र लावुन थांबलेला असल्याची गोपणीय माहीती मिळालेवरुन तात्काळ पो.नि.प्रताप दराडे यांचे आदेशाने गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि. योगिता कोकाटे ह्या पोलीस स्टाफ व पंचासह चारचाकी वाहन तसेच काही पोलीस अंमलदार दुचाकी वाहनाने नमुद बातमीचे ठिकाणी गेले. पोलीसांना मिळालेल्या बातमीप्रमाणे झाडाखाली एका इसम हा संशयास्पद रित्या थांबलेला दिसला. नमुद इसम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार विरजु जाधव असल्याची खात्री होताच पोलीस पथक ठिक 14.20 वा. त्यास जागीच पकडीत असता तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्यास पो.कॉ. प्रमोद लहारे, सुरज कदम, तानाजी पवार यांनी जागीच पकडले. सपोनि कोकाटे मॅडम यांनी नमुद इसमास विश्वासात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव बिरज्या उर्फ बिरजु राजु जाधव, वय 26 वर्षे, रा. मकासरे चाळ, कोठी-स्टेशन रोड, पाटील हॉस्पीटलचे पाठीमागे, अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्याची पोलीसांनी उपस्थित पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात 1) 30,000/- रु कि.चे एक लोखंडी स्टील कलरचे गावठी बनावटीचे अग्निशस्र त्यास मुठीला खालचे बाजूने आत मॅगझीन लावलेले असलेले जु.वा.कि.अं. 2) 1000/- रु कि.चे दोन लहाण आकाराचे काडतुसे नमुद अग्रिशस्त्राचे मॅगझीन मध्ये मिळुन आलेले असा एकुन 31,000/- रु किं.चा मुद्देमाल मिळून आला. स.पो.नि. योगिता कोकाटे यांनी पंचासमक्ष नमुद मुद्देमाल जप्त केला. नमुद इसमास कारवाईकामी पोलीस स्टेशनला त्याचे ताब्यात मिळालेल्या अग्निशस्रासह आणण्यात आले आहे. पो.कॉ. प्रमोद लहारे यांचे फिर्यादीवरुन नमुद आरोपीताचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर गु.र.नं. 447/2024 शस्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास स.पो.नि. योगिता कोकाटे ह्या करित आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग श्री. अमोल भारती, सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे सपोनि. योगीता कोकाटे, पो.हे.कॉ. योगेश भिंगारदिवे, ए.पो. इनामदार, संदिप पितळे, पो.ना. अविनाश वाकचौरे, म.पो.ना. संगिता बडे, पो.कॉ. दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, अतुल काजळे, सुरज कदम, सचिन लोळगे, अमोल गाडे, सुजय हिवाळे यांनी केली आहे