प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक बिनविरोध साठी बैठक संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आदर्श बहुजन शिक्षक संघाच्या आव्हानाला मंडळांचा पाठिंबा

सभासद हितासाठी शिक्षक बँक बिनविरोध करावी – उत्तरेश्वर मोहोळकर

 

अहमदनगर प्रतिनिधी : शिक्षक बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी बहुजन शिक्षक संघाने पुढाकार घेतला असून इतर प्राथमिक शिक्षक संघटनांशी बैठक संपन्न झाली. सभासदांच्या हिताच्या कारभारासाठी बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्यास बँकेची प्रतिष्ठा राज्यभर वाढेल यात निवडणुकीत होणार खर्च टाळला जाईल याचबरोबर समाजामध्ये शिक्षकांची प्रतिमा मलीन होणार नाही. सभासदांच्या हितासाठी जर बँक बिनविरोध होत असेल तर आम्ही निवडणूक रिंगणातून  बाहेर जाऊ असे आव्हान इतर शिक्षक संघटनांच्या बैठकीत बहुजन शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर यांनी केले.

प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आदर्श बहुजन शिक्षक संघाने इतर संघटनांशी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आदर्श बहुजन शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर, गुरुमाऊली तांबे गटाचे दत्ता कुलट, गुरुकुल मंडळाचे संजय धामणे, रा.या. औटी, गुरुमाऊली रोहकले गटाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, बहुजन मंडळाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे, स्वराज्य मंडळाचे नाना गाढवे, सदिच्छा मंडळाचे बाबा आव्हाड, ऐक्य मंडळाचे राजेंद्र निमसे, प्राथमिक शिक्षक संघाचे आबा जगताप, रघुनाथ झावरे, परिवर्तन मंडळाचे राजेंद्र विधाते, एल.पी. नरसाळे, विजय काकडे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली.आदर्श बहुजन शिक्षक संघ (IBTA) संघटनेचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहळकर यांनी शिक्षक बँक व विकास मंडळ निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन जिल्हयातील सर्व संघटनाचे व मंडळाच्या प्रमुखांना पत्र देऊन, प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून केले होते.

या आवाहनास प्रतिसाद देत जिल्हयातील सर्व प्रमुख संघटना / मंडळ यांची सहविचार सभा शनिवार दिनांक ०२/०७/२०२२ रोजी अहमदनगर येथे दुपारी ३.०० वाजता पार पडली. प्रथम रमेश सोनवणे यांनी सर्व शिक्षकांची प्रतिष्टा राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख संघटना /मंडळ यांचे प्रतिनिधी सहविचार सभेस उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे स्वागत केले व शिक्षक बँक / विकास मंडळ निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी आपल्या मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्याविषयीची भूमिका विषद करावी असे आवाहन केले. यास प्रतिसाद देत गुरुमाउली (तांबे गट) मंडळाचे प्रतिनिधी श्री. दत्ता कुलट यांनी या प्रस्तावास बिनविरोध पाठींबा दर्शविला व ही निवडणूक बिनविरोध होत असेल तर सभासद हितासाठी आमच्या मंडळाला एकही जागा नको असे जाहीर केले.

शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष व गुरुकुल मंडळाचे प्रतिनिधी श्री. संजय धामणे यांनीही या प्रस्तावास बिनविरोध पाठींबा दर्शविला व आमच्या मंडळास आमच्या सभासद संख्येनुसार प्रतिनिधित्व मिळावे असे मत मांडले.समितीचेच राज्य उपाध्यक्ष रा.या.औटी यांनी इन्टा संघटनेचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहळकर यांनी शिक्षक बँक व विकास मंडळ निवडणूक बिनविरोध करावी हा मांडलेला प्रस्ताव खरोखरच शिक्षक हिताचा असून सर्वानी तो सत्यात उतरवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.

गुरुमाउली (रोहाकले गट) मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री. विकास डावखरे यांनी या प्रस्तावास बिनविरोध पाठींबा दर्शविला व सभासद हितासाठी आमच्या मंडळाला एकही जागा नको असे जाहीर केले तसेच सर्व संघटना एकत्र करून भ्रष्टाचारमुक्त कारभार होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.बहुजन मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री. एकनाथ व्यवहारे यांनी इब्टा संघटनेचे राज्याध्यक्ष यांनी मांडलेल्या या प्रस्तावास बिनशर्त पाठिबा देऊन निवडणूक बिनविरोध होत असेल तर आमचे मंडळ सभासद हितासाठी एकही जागा घेणार नाही असे जाहीर केले.

सदिच्छा मंडळाचे प्रतिनिधी श्री. बाबा आव्हाड यांनी या प्रस्तावास बिनशर्त पाठिबा देऊन आमच्या मंडळास आमच्या सभासद संख्येनुसार प्रतिनिधित्व मिळावे असे मत मांडले. स्वराज्य मंडळाचे प्रतिनिधी श्री. नाना गाढवे यांनी या प्रस्तावास बिनशर्त पाठिबा देऊन आमच्या मंडळास प्रतिनिधित्व मिळावे असे मत मांडले. ऐक्य मंडळाचे प्रमुख श्री. राजेंद्र निमसे यांनी या प्रस्तावास बिनशर्त पाठिबा देऊन आमच्या मंडळास प्रतिनिधित्व मिळावे असे मत मांडले.

प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट) राज्य सरचिटणीस श्री. आबा जगताप व रघुनाथ झावरे यांनी या प्रस्तावास बिनविरोध पाठींबा दर्शविला व सभासद हितासाठी आमच्या मंडळाला एकहीजागा नको असे जाहीर केले.परिवर्तन मंडळाचे प्रमुख श्री. राजेंद्र विधाते यांनी या प्रस्तावास बिनशर्त पाठिबा देऊन आमच्या मंडळास प्रतिनिधित्व मिळावे असे मत मांडले. एकल मंडळाचे प्रमुख श्री. एल. पी. नरसाळे यांनी या प्रस्तावास बिनशर्त पाठिबा दिला व ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

साजिर मंडळाचे प्रमुख श्री.विजय काकडे यांनी या प्रस्तावास बिनविरोध पाठींबा दर्शविला व सभासद हितासाठी आमच्या मंडळाला एकही जागा नको असे जाहीर केले फक्त बिनविरोध मध्ये जास्त प्रमाणात महिला सभासद यांना प्रतिनिधित्व द्यावे असे सांगितले.इब्टा संघटनेचे राज्याध्यक्ष श्री उत्तरेश्वर मोहळकर यांनी सभासद हित व समाजातील शिक्षकांची प्रतिष्टा जपण्यासाठी सर्वांनी या निवडणुकीमध्ये एकमेकांची बदनामी न करण्याचे आवाहन केले व ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी फॉर्म भरलेल्या उमेदवार यांच्यासाठी एक गुगल लिंक व सभासद यांच्यासाठी एक लिंक तयार करून सर्वाची मते आजमावली जातील असे सांगितले व लवकरच परत एकदा बसून हि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.

ही योजना अमलात कशी आणली जाईल यावर सभेत चर्चा करण्यात आली यात सर्व प्रतीनिधी यांनी आपापले विचार मांडले. सर्वांचे आभार मानून परत लवकरच बसून निर्णय घेऊ असे सर्वानुमते ठरले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!