प्राथमिक शिक्षक बँकेत पुन्हा सत्तांतर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी अविनाश निंभोरे तर व्हाईस चेअरमनपदी गंगाराम गोडे यांची निवड

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.चेअरमनपदी अविनाश निंभोरे तर व्हाईस चेअरमनपदी गंगाराम गोडे यांची निवड झाली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे यांचे सहकार्य लाभले.

या निवडीत अविनाश निंभोरे हे 13 मते मिळवून चेअरमन तर व्हाईस चेअरमनपदी गंगाराम गोडे यांची बिनविरोध निवड झाली.अविनाश निंभोरे यांना सूचक म्हणून माजी व्हाईस चेअरमन नानासाहेब बडाख तर राजू मुंगसे यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या होत्या. शिक्षक परिषदेचे नेते रावसाहेब रोहोकले, संजय शेळके, प्रवीण ठुबे, विकास डावखरे, संजय शिंदे,भाऊसाहेब ढोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली.

यावेळी बँकेच्या संचालिका सीमाताई क्षिरसागर, उषाताई बनकर, मंजुषाताई नरवडे, विद्युल्लताताई आढाव, संचालक संतोष अकोलकर, दिलीप  औताडे, राजेंद्र मुंगसे, नानासाहेब बडाख, संतोष दुसुंगे, शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाठ, अनिल भवार, सलीमखान पठाण, सुयोग पवार, किसन खेमकर, बाळासाहेब मुखेकर, बाबा खरात, राजू रहाणे, साहेबराव अनाप आदी उपस्थित होते.
———————
प्राथमिक शिक्षक बँकेत पुन्हा सत्तांतर झाले असून, तांबे गटाकडे असलेली सत्ता रोहोकले गटाने उलथवली आहे. बँकेच्या सत्तेची समीकरणे पुन्हा बदलली आहे. गुरुमाऊली मंडळाच्या तांबे गटाकडील सहा संचालक फुटून रोहोकले गटात गेल्याने सत्ता परिवर्तन झाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!