प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची रविवारी सर्वसाधारण सभा.   

0
39

गुरुजींचा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बाबत महत्त्वाचा निर्णय.  

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची रविवारी सर्वसाधारण सभा होणार असून या सभेमध्ये विकास मंडळाच्या जागेवर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बांधण्याचा संकल्प विकास मंडळाचे विश्वस्त गुरुमाऊली व आघाडीचे नेत्यांनी केलेला आहे यासाठी सर्व सभासदांच्या बँकेच्या कायम ठेवीतून वीस हजार रुपये विकास मंडळाच्या नियोजित हॉस्पिटल साठी ठेव म्हणून वर्ग करण्याचे ठरवले आहे. शिक्षकांच्या पूर्वजांनी जवळपास अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 52 गुंठे जागा घेऊन या ठिकाणी यापूर्वी गुरुकुल नावाचे संकुल उभे केले उर्वरित जागेत हॉस्पिटल व कॉम्प्लेक्स बांधण्याचे नियोजन असून या सर्वसाधारण सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहून या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घ्यावा असे आवाहन अध्यक्ष विलास गवळी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

तसेच पुढे म्हणाले की, विकास मंडळासाठी सर्व सभासदांनी वीस हजार ठेव शिक्षक बँकेच्या कायम ठेवीतून कपात करून विकास मंडळासाठी द्यावे या ठेवीवर शिक्षक बँकेप्रमाणे व्याज दिले जाईल व डिसेंबर झाल्यावर अथवा राजीनामा दिल्यानंतर ही ठेव सभासदांना पुन्हा मिळणार असून असा करार विकास मंडळांनी शिक्षक बँकेची केलेला आहे यापूर्वीच्या विश्वस्तांनी शिक्षक बँकेची कोणताही करारनामा न करता व विकास मंडळासाठी ऐच्छिक ठेवायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते बांधकाम रखडले आहे मुळात बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुमाऊली मंडळाचे विकास मंडळ सत्ता आल्यावर विकास मंडळाच्या खात्यात अवघे 23000 शिल्लक होते व संबंधित ठेकेदाराची जवळपास एक कोटी दहा लाखाची रक्कम देणे बाकी होती अशा परिस्थितीत विकास मंडळाची सूत्रे हातात घेतली गुरुकुल या कॉम्प्लेक्स मधील सर्व  गाळ्याचे कराराचे नूतनीकरण करून भाडेवाढ करून सक्तीने वसुली करून विकास मंडळाचे उत्पन्न वाढण्याचा प्रयत्न केलेला आहे.

होणाऱ्या सर्वसाधारण सभेत विकास मंडळाच्या जागेवर हॉस्पिटल बांधण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून वास्तू अहमदनगर शहराच्या भर घालणारी असून जिल्ह्यातील तमाम 12000 प्राथमिक शिक्षकांची ही वास्तू असणार आहे याचा सार्थ अभिमान सर्व गुरुजींना असणार व सर्वांनी मोठ्या मनाने हा ठराव मंजूर करावा सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन या विकास मंडळाचे बांधकाम व नियोजित आराखडा याबाबत सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल असे आवाहन उपाध्यक्ष संजय शेंडगे, सचिव संतोष मगर, खजिनदार सुवर्णाताई राठोड यांनी केले.

याप्रसंगी विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते, राजेंद्र निमसे, गणेश गायकवाड, चांगदेव काकडे, प्रल्हाद भालेकर, बाळासाहेब गमे, अनिता उगले, प्रदीप दळवी, नवनाथ दिवटे, दत्तू फुंदे, मनीषा गाढवे, उर्मिला राऊत, संतोष आंबेकर, दिलीप गंभीरे, शिक्षक बँकेचे चेअरमन संदीप मोटे, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब तांबे, गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे, राज्य संघाचे अध्यक्ष दत्ता कुलट, गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, विठ्ठल फुंदे, विजय ठाणगे, आर.टी. साबळे, माजी चेअरमन साहेबराव अनाप, संतोष दुसूगे, शरद सुद्रिक, राजू रहाणे, सलीमखान पठाण, अर्जुनराव शिरसाठ, बाबासाहेब खरात, राष्ट्रीय महिला आघाडीच्या विद्युलता आढाव, जिल्हा महिला आघाडीच्या अंजली मुळे आदीसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here