प्रा.अनुरिता झगडेंचा माजी मंत्री थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश…

- Advertisement -

झगडेंवर ओबीसी काँग्रेस विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविणार – काळे

————————————————————
अहमदनगर प्रतिनिधी : सामाजिक कार्यकर्त्या, तसेच बारा बलुतेदार महासंघाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. अनुरिता झगडे यांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आ.थोरात यांनी प्रा. झगडे यांचे पक्षात स्वागत केले. प्रा. झगडेंवर लवकरच ओबीसी काँग्रेस विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविणार असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना काळे यांनी केले आहे. 
 
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माथाडी कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे सुनील क्षेत्रे, उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, युवक व क्रीडा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, शहर जिल्हा सचिव रतिलाल भंडारी, ग्रंथालय काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब लांडगे, जयराम आखाडे, रोहिदास भालेराव, राधेश भालेराव, विजय शिंदे, दिपक काकडे, बाबसाहेब वैरागर, उद्योजक प्रदीपशेठ पंजाबी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
प्रा. अनुरिता झगडे या उच्चशिक्षित असून त्यांचे एम.ए, एम.एड., डी.एस.एम. पर्यंत शिक्षण झाले आहे. पुण्यातील नामांकित खाजगी शैक्षणिक संस्थेत त्यांनी अनेक वर्ष प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे. प्रा. झगडे या राष्ट्रीय मानवाधिकार आयोग द्वारा संचालित मानवाधिकार संघटनेच्या महिला संरक्षण समितीच्या चेअरमन तसेच श्रीरामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या विद्यमान संचालिका आहेत.
 
 
नगर शहरातील एकल महिलांसाठी मानसिक आरोग्यावर व्याख्यान, महाराष्ट्रात विविध ठिकाणी महिला उद्योजकता, राष्ट्रनिर्मिती व व्यक्तिमत्व विकास यावर व्याख्याने, पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मानसिक आरोग्यासाठी योग्य आहार यावर मार्गदर्शनपर विविध उपक्रमांमध्ये त्यांच्या हिरिरीने सहभाग राहिलेला आहे. तसेच कोरोना काळात आरोग्य केंद्रावर सामान्य माणसाला लस मिळावी यासाठी त्यांनी काम केले आहे. पक्ष प्रवेशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रा. झगडे म्हणाल्या की, किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इथून पुढील महिला संघटन आरोग्य, शिक्षण, महिला, ओबीसी समाज बांधव यांच्या सामाजिक प्रगतीसाठी मी काम करणार आहे. 
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!