स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने सत्कार
अहमदनगर प्रतिनिधी – भारतीय संस्कृतीत गुरुंचे स्थान महत्त्वाचे आहे. अंधकारमय जीवनात गुरु प्रकाशाची वाट दाखवत असतात. प्रा. माणिक विधाते यांनी शिक्षक असताना अनेक उच्चपदस्थ विद्यार्थी घडवले. आता ते राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून चांगले कार्यकर्ते घडवत आहेत. प्रा. विधाते हे विद्यार्थी व कार्यकर्ते घडवणारे विद्यापीठ आहे, असे गौरवोद्गार आमदार अरुण जगताप यांनी काढले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांचा वाढदिवसानिमित्त स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने आमदार जगताप यांनी सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, सुमतीलाल कोठारी, भूपेंद्र परदेशी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, प्रा. विधाते यांनी विद्यार्थी व कार्यकर्त्याला मार्गदर्शन करुन त्यांच्या जीवनाला योग्य दिशा दिली. प्रा. विधाते यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी, परिणामकारक, ज्ञान समृद्ध आहे. ते विद्यार्थ्यांसाठी आिण आता कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्यांना सामाेरे जाण्यासाठी त्यांनी विद्यार्थी व कार्यकर्त्यांना सक्षम बनवले आहे.
स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले, प्रा. विधाते यांनी त्यांच्या पदाच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यात सहजतेने आणि साधेपणाने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. बुद्धिमान, कार्यक्षम व स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे.