प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शेतकरी, अल्पसंख्यांक, दलितांवर मनुवादी भाजप सरकारची दडपशाही सुरू आहे – किरण काळे 

अहमदनगर  प्रतिनिधी : भाजप मंत्र्याच्या मुलाच्या गाडीखाली उत्तर प्रदेश मध्ये चिरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांना भाजप सरकारच्या वतीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लालटाकी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रियंका गांधी यांच्या समर्थनार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्यामुळे परिसर दणाणून गेला होता.

उत्तर प्रदेश मध्ये प्रियंका गांधी यांच्या अटकेमुळे वातावरण तणावपूर्ण आहे. गांधी यांच्या अटकेचे तीव्र पडसाद देशभर उमटले आहेत. महाराष्ट्रात देखील विधिमंडळ पक्षाचे नेते ना.बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. नगर शहरात देखील याचे तीव्र पडसाद उमटले असून प्रियंका गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे.

यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, प्रियंका गांधींना अटक काय करताय? अटक करायचीच असेल तर ज्या भाजपा मंत्र्याच्या मुलाच्या गाडीखाली निष्पाप चिरडले गेले त्याला अटक करा. देशामध्ये अराजकता माजली असून शेतकरी, अल्पसंख्याक, दलित यांच्या वर दडपशाही करण्याचे काम उत्तर प्रदेश व देशातील मनुवादी भाजप सरकार करीत आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी नरसंहाराच्या निषेधार्थ संतापाची लाट देशभर उसळली आहे. प्रियंका गांधी तीस किलोमीटर अंतर पायी चालत निघाल्या होत्या. त्यांच्याशी गैरवर्तन केले गेले. त्यांना अटक केली गेली. आयर्न लेडी इंदिरा गांधी यांना देखील १९७७ साली याच दिवशी अटक केली होती.

हा नियतीचा योगायोग आहे. इंदिरा गांधीं सारखे कणखर नेतृत्व देशातील जनता आज प्रियंका गांधी यांच्यामध्ये अनुभवत आहे. प्रियंका गांधींशी गैरवर्तन करत त्यांना अटक करत लोकशाहीचा आवाज दडपणाऱ्या मोदी – योगी सरकारचा शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करत आहोत, असे यावेळी किरण काळे म्हणाले.

यावेळी  ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, माजी नगरसेविका जरीना पठाण, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जू शेख, सेवादल महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, महिला काँग्रेसच्या शकिला शेख, राहुल गांधी विचार मंचचे शहर अध्यक्ष सागर ईरमल, बालाजी गिरी, अविनाश धनगर, राजकुमार अबोले, अजय मिसाळ, शहबाज खान, शरीफ सय्यद, अब्दुल्लाह हैदर आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते निदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!