प्र.क्र.१५ मधील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करा
याचबरोबर ड्रेनेज लाईन सार्वजनिक स्वच्छतेकडे आयुक्तांनी लक्ष घालावे माजी नगरसेवकांची मागणी
नगर : प्र.क्र.१५ मधील काटवन खंडोबा गाजी नगर, आनंद नगर, काळे कॉलनी, पंचशील वाडी आदी भागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण झाली आहे. याचबरोबर अर्बन बँक कॉलनी झेडपी या भागातील ड्रेनेजचा प्रश्न गंभीर बनला असून सर्वत्र पाणी वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत प्रश्न तातडणे सोडविले गेले पाहिजे यासाठी आ.डॉ. पंकज जावळे यांनी तातडीनेलक्ष घालून प्र.क्र.१५ मधील नागरिकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडावे अशी मागणी मा.नगरसेवक दत्ता जाधव, दीपक खैरे, प्रशांत गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
- Advertisement -