फटाके बंदीचा मनसेने केला जाहीर निषेध

- Advertisement -

फटाके बंदीचा निर्णय हिंदूत्वावर घाला – नितीन भुतारे

अहमदनगर प्रतिनिधी – राज्य सरकारचा फटाके बंदीचा निर्णय जाहीर करणार असल्याचे समजल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात मनसेच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथेफटाके फोडून निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ,सचिव नितीन भुतारे, विद्यार्थी सेना प्रमुख परेश पुरोहित,संकेत व्यवहारे,संतोष साळवे,अशोक दातरंगे,समर्थ उकांडे,संकेत होसिंग,अक्षय नक्का आदि उपस्थित होते.

याप्रसंगी नितीन भुतारे म्हणाले,गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे अनेक सण उत्सवावर शासनाने बंदी घातली होती.आता परिस्थिती पूर्वपदावर येत असतांना व राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असतांना,राज्य सरकारने जवळ-जवळ सर्वच निर्बंध उठविले आहेत.गेल्या ३-४ महिन्यांपासून रोजगार, उद्योग-धंदे रुळावर येत आहेत.दिवाळी हा सर्वांत मोठा वआनंदाचा सण या सणात फटाके हा महत्वाचा घटक असल्याने ते उडविणार्‍या बंद घालणे म्हणजे सरकार हे पुर्णत: हिंदू विरोधात काम करत असल्याचे दिसते.

त्याचप्रमाणे फटाका उद्योगावर अनेकांचे संसार आहेत,आज दिवाळी तोंडावर असतांना अनेक व्यापार्‍यांनी कर्ज काढून फटाक्यांची खरेदी केली आहे आणि अचानकपणे सरकार फटाक्यांवर बंदी घालत आहेत.हा कोणता तुघलकी निर्णय म्हणावा.या निर्णयास आमचा विरोध आहे,आम्ही राज्यात फटाके वाजविणार जर त्यास विरोध झालाच तर संबंधित अधिकार्‍यांच्या दालनात फटाके उडवू,असे श्री.भुतारे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सचिन डफळ म्हणाले,मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वत्र विस्कळीतपणा आला होता.उद्योग-धंदे सर्वत्र ठप्प झाले होते.मात्र आता निर्बंध शिथील करण्यात आल्यामुळे हळहळू जनजीवन सुरळित होत आहे.असे दिसत असतांनाच राज्य सरकारने वसुंधरा महोत्सवाच्या अंतर्गत सर्व मनपा,पालिका,ग्रामपंचायत आदि ठिकाणी आदेश काढून फटाके विक्री,फटाके वाज़विणे यावर बंदी घालण्यात येण्याच्या तयारीत आहेत.या निर्णयास मनसेचा विरोध राहील.हा निर्णय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

यावेळी आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.आघाडी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करुन निषेध व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!