सावेडी जॉगिंग ट्रॅक येथे शहर भाजपाच्या वतीने विभाजन विभिषिका स्मृतीदिन साजरा
राष्ट्राची उन्नती विकास आणि स्वतःच्या व्यक्तिमत्व विकास या दृष्टीने पंचप्राण शपथ संपन्न
नगर : भारत देशाला महान संस्कृती, परंपरा व इतिहास लाभला आहे आपण आपला इतिहास विसरल्यामुळे लव जिहाद व लँड जिहाद फोफावला आहे. राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहिली पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे, उद्याचा भारत हा अखंड भारत आहे, ज्या दिवशी अखंड भारत पूर्ण होईल तेव्हा खरा देश स्वातंत्र्य होईल. आपण सर्वजण फाळणीच्या वेदना विसरून चाललो आहे सर्वांनी यापुढील काळात अखंडित भारतासाठी काम करावे असे प्रतिपादन रवींद्र मुळे यांनी केले.
सावेडी जॉगिंग ट्रॅक येथे अहमदनगर शहर भाजपाच्या वतीने विभाजन विभिषिका स्मृतीदिन साजरा करून प्रदर्शन व पंचप्राण शपथ ग्रहण संपन्न झाले. यावेळी रवींद्र मुळे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भैय्या गंधे, रामदास आंधळे, रवींद्र बारस्कर, संजय ढोणे, किशोर बोरा, सचिन पारखी, बाळासाहेब गायकवाड, मनोज ताठे, विवेक नाईक, नितीन शेलार, किशोर वाकळे, पल्लवी जाधव, संगीता खरमाळे, सुजाता औटी, अनिल जोशी, अनिल गट्टानी, दत्ता गाडळकर, श्रीराम येंडे, भैय्या परदेशी, शरद धोंडे, राम वडागळे, बाळासाहेब सोनवणे, प्रशांत मुथा, उपेंद्र कुलकर्णी, नरेंद्र कुलकर्णी, प्रिया जानवे, ज्योती डहाळे, छाया धोंडे, किशोर सरोदे, मनोहर देशपांडे, दामोदर बठेजा, सुरेश हिरानंदानी, चेतन जग्गी, पुष्कर कुलकर्णी, अशोक आहुजा, उमेश साठे, उदय अनुभुले, बाळासाहेब भुजबळ, अनिल सबलोक आदी उपस्थित होते.
शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विभाजन विभिषिका स्मृती दिनानिमित्त या दुःख घटनेचे स्मरण म्हणून फाळणीच्या वेळी घडलेल्या घटनांशी संबंधित फोटो प्रदर्शन सावेडी जॉगिंग ट्रॅक येथे लावण्यात आले आहे फळणीच्या वेदना समाजापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत नागरिकांना वेदना कळणार नाही प्रत्येकाने जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव ठेवून समाज आणि देशाच्या विकासासाठी काम करावे, असे ते म्हणाले.
यावेळी माजी नगरसेवक नितीन शेलार यांनी राष्ट्राची उन्नती विकास आणि स्वतःच्या व्यक्तिमत्व विकास या दृष्टीने पंचप्राण शपथ दिली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.