फिनिक्सच्या निस्वार्थ कार्याने डॉ.गिरीष राव भारावले
लाखोंच्या संख्येने गरजूंची मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे केले कौतुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचे काम करणारे फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या कार्याचे मेडिकल रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा चेन्नई येथील शंकर नेत्रालयाचे वरिष्ठ संचालक डॉ. गिरीष राव यांनी कौतुक केले.
शहरात एका कार्यक्रमानिमित्त आलेले डॉ. गिरीष राव यांची भेट घेऊन फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा रुग्णालय नेत्र विभागाचे सतीश आहिरे आदी उपस्थित होते. बोरुडे यांनी गेल्या 31 वर्षापासून फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून शिबिर घेऊन हजारो गोरगरीब नेत्रदोष असलेल्या रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्या असून, या सेवेच्या माध्यमातून अनेकांना नवदृष्टी मिळाली असल्याची माहिती दिली.
तर नागरिकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित करुन अनेकांचे मरणोत्तर नेत्रदान घडवून आनल्याचे स्पष्ट केले. फिनिक्सच्या निस्वार्थ सामाजिक कार्याने डॉ. राव भारावले व शिबिराच्या माध्यमातून सुरु असलेल्या रुग्णसेवेचे कौतुकही केले.
- Advertisement -