फिरोदिया-शिवाजीयन्स फुटबॉल अकॅडमीच्या वतीने खेळाडूंसाठी फुटबॉल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील नवोदित खेळाडूंना फुटबॉल खेळाचे तंत्रशुध्द माहिती व ज्ञान देऊन त्यांच्यातील खेळाचे गुणविकसीत करण्यासाठी मॅक्सीमस स्पोर्टस अकॅडमीच्या माध्यमातून फिरोदिया-शिवाजीयन्स फुटबॉल अकॅडमीच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दि.१५ डिसेंबर पासून या प्रशिक्षण वर्गाचे प्रारंभ होणार असून, याचा खेळाडूंनी लाभ घेण्याचे आवाहन मॅक्सीमस स्पोर्टस अकॅडमीचे नरेंद्र फिरोदिया व शिवाजीयन्स फुटबॉल क्लबचे मनोज वालवेकर यांनी केले आहे.

या प्रशिक्षण वर्गात पाच वर्षा पुढील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. सोमवार ते शनिवार या संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत प्रशिक्षण वर्ग गुलमोहर रोड,नवलेनगर येथील द अल्फा स्पोर्टस अ‍ॅण्ड लश ग्रीन टर्फ मैदानावर चालणार आहेत.

यामध्ये सर्वोत्तम फुटबॉल प्रशिक्षकांकडून युवक-युवतींना मार्गदर्शन करण्यात येणार आहेत.खेळाडूंच्या खेळातील उणीवांची जाणीव करुन देऊन त्यांचे खेळ व कौशल्य अधिक विकसीत होण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

या प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8796858947, 9604494961 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!