अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर
सरपंच सेवा संघाच्या वतीने(महाराष्ट्र राज्य)सोलापुर जिल्ह्यातील माढा येथील समाजसेवक फुलचंद जरीचंद नागटिळक यांना समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.निस्वार्थी भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिलासा तसेच वृक्ष लागवडसह विविध योजना राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी तसेच सामाजिक कामातील आपले योगदान कामा प्रती असलेली बांधिलकी, सर्व सामान्य माणसाला आधार देण्यासाठी आपण अहोरात्र घेत असलेली मेहनत आपण केलेले काम इतरांना देखील प्रेरणादायी ठरणारे आहे.
यामुळेच “स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा ‘मान कर्तृत्वाचा…. सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ आपणांस आदरपूर्वक सन्मानीत करण्यात येत आहे. आपण आपल्या क्षेत्रातील प्रेरणास्थान आहे.या पुरस्काराचे वितरण रविवार दि.३० जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वा.सावेडी येथील माऊली संकुल सभागृह येथे होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सरपंच सेवा संघाचे (महाराष्ट्र राज्य) संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील,प्रदेशाध्यक्ष रोहीत संजय पवार,राज्य संपर्क प्रमुख अमोल शेवाळे, संघटक रविंद्र पवार,विश्वस्त सौ.सुजाता कासार आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
- Advertisement -