बँकांमध्ये होणारे दैंनदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे – निवडणूक खर्च निरीक्षक ममता सिंग

- Advertisement -

बँकांमध्ये होणारे दैंनदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे – निवडणूक खर्च निरीक्षक ममता सिंग

विविध यंत्रणेच्या नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा

शिर्डी, दि.२५ एप्रिल – राष्ट्रीयकृत, खासगी व सहकारी बँकांमध्ये बॅकांमध्ये होणारे दैंनदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे. अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक ममता सिंग यांनी बँकांशी संबंधित समन्वय अधिकाऱ्यांना आज येथे दिल्या. शिर्डी शासकीय विश्रामगृहात विविध यंत्रणेतील समन्वय (नोडल) अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा श्रीमती सिंग यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, बॅंक व आयकर विभागाशी संबंधित समन्वय (नोडल) अधिकारी यांच्या निवडणूक खर्च विषयक कामकाजाचा त्यांनी यावेळी आढावा घेऊन सूचना दिल्या.
खर्च निरीक्षक ममता सिंग यांनी यावेळी सर्व नोडल अधिकारी व खर्च व्यवस्थापनासंदर्भात उपस्थित इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक खर्च व्यवस्थापन वेळीच व योग्य प्रकारे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय अतिसंवेदनशील भागाविषयी माहिती जाणून घेतली व अशा भागात विशेष उपाययोजना राबविण्याबाबत उत्पादन शुल्क व पोलीस विभागास सूचना दिल्या. शिर्डी विधानसभा मतदार संघात असलेल्या देशी-विदेशी दारू विक्रीच्या परवानाधारक अनुज्ञप्त्यांच्या स्टॉक रजिस्ट्ररची नियमित तपासणी करण्यात यावी. असेही श्रीमती सिंग यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रमोद सोनोने, शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक शिरिष वमने, समन्वय अधिकारी (खर्च) सदाशिव पाटील, सहायक समन्वय अधिकारी (खर्च) बाबासाहेब घोरपडे व सचिन धस, सहायक खर्च निरीक्षक विवेक वर्मा, लीड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक आशिष नवले, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, आयकर विभागाचे समन्वय अधिकारी अशोक मुराई, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!