बंद पथदिव्यांच्या निषेधार्थ शिवसेनेने आयुक्तांना दिला कंदील भेट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कारभारात सुधारणा न झाल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरतील- विक्रम राठोड

     नगर – सावेडी, प्रोफेसर कॉलनी चौकातील बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरु करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने मनपा आयुक्तांना कंदील भेट देण्यात आला. याप्रसंगी युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर (शरद पवार गट), नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरिष ज़ाधव, नगरसेवक योगीराज गाडे, दत्ता जाधव, अमोल येवले, परेश लोखंडे, अशोक दहिफळे, मुन्ना भिंगारदिवे, संतोष पाटील, अरुण झेंडे, महेश शेळके, उमेश भांबरकर, संतोष डमाळे, पप्पू ठुबे, गुडू भालेराव, विशाल गायकवाड, जेम्स आल्हाट, जालिंदर वाघ, गिरिधर हांडे, श्रीकांत कोडम, अमित लढ्ढा, सुरेश क्षीरसागर, दत्तात्रय हजारे, सुनिल भोसले, अक्षय नागापुरे आदिंसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरातील सावेडी भागातील प्रोफेसर कॉलनी चौकापासून पुढे हडकोकडे जाणारे पथदिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद आहेत. या मागचे गौडबंगाल काय आहे हे काही केल्या समजत नाही. या रस्त्याचे आणि पथदिव्याचे काम पूर्ण होऊन काही महिने उलटून गेली आहेत. परंतु या ठिकाणी पथदिवे आम्ही घेतलेल्या माहिती नुसार जाणून बुजून बंद ठेवण्यात आले आहेत. सावेडी भागातील हा अतिशय महत्वाचा आणि मोठी वर्दळ असलेला रस्ता आहे. नगर आकाशवाणी, तहसील कार्यालय, मनपा प्रभाग कार्यालय, आरोग्य केंद्र, तोफखाना पोलीस स्टेशन या रस्त्यावर आहे. प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीच्या वेळी चौपाटी सारखे वातावरण असते. पण येथील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे येथे अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच छोटे मोठे वाहन अपघात घडतात. रात्रीच्या वेळी रस्यावर सामसूम असताना अनेक वाहन चालक या पथदिव्यांना धडकतात. वास्तविक हे पथदिवे एका दिवसात सुरु होऊ शकतात परंतु  हे पथदिवे स्थानिक लोक प्रतिनिधींचे संबंधित ठेकेदाराशी वाद झाल्यामुळे त्यांनी हे काम बंद पाडल्याची आमची माहिती आहे. या मागचे कारण आपण शोधून काढावे आणि हे बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरु करावेत.

     नगर शहरातील अनेक भागात विशेषत: उपनगरात पथदिवे बंद असतात. कोट्यवधी रुपये खर्च करून मनपाने संपूर्ण शहराचे पथदिवे बदलले. त्याची दुरुस्ती आणि देखभालीचे टेंडर एका खाजगी ठेकेदार कंपनीला दिले. मनपाचे वाढत चाललेले वीज बिल कमी करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली. हे विजेचे बिल वाचविण्यासाठी ठेकेदारच आळीपाळीने पथदिव्याच्या वीज पुरवठा बंद तर ठेवत नाही ना याची देखील खातरजमा आपण करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

     याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत, त्यात स्ट्रीट लाईटही बंद असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मनपाचा या ठेकेदारावर वचक राहिलेला नाही. त्यामुळे मनपा व नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत होत आहे. पालिकेच्या कारभारात सुरु असलेला दिव्याखालचा अंधार दूर करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने शिवसैनिक रस्त्यावर उतरेल असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!