दहावीनंतरच्या शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनावर व्याख्यानाचे आयोजन
अहमदनगर – बंसल क्लासेसच्या वतीने शहरातील इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचे शनिवारी (दि.10 जून) सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर दहावीनंतरच्या शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सावेडीच्या माऊली सभागृहात सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार असून, यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन बंसल क्लासेसचे सल्लागार अभय श्रीश्रीमाळ, ब्रँच मॅनेजर प्रा. संजय सूर्यवंशी, दिगंबर मिटकर यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी आमदार संग्राम जगताप, नगरसेविका शितलताई जगताप, डॉ. व्ही.एन. देशपांडे, डॉ. आशिष भंडारी, डॉ. अमित भराडीया, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त लेखा अधिकारी राजू लाकूडझोडे, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, डॉ. सतीश सोनवणे, अॅड. सतीशचंद्र सुद्रिक, उद्योजक पाराजी सातपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रेरक वक्ते तथा लेखक प्रा. बालाजी जाधव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. इयत्ता दहावीमध्ये 70 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकाची प्रत 9607834747 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे पाठविण्याचे सांगण्यात आले आहे.