बांधकाम स्टील उद्योगात प्रगतीसाठी परदेशातील प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक – पोलाद स्टील डायरेक्टर नितिन काबरा.

- Advertisement -
आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असोच्या वतीने सभासदांसाठी स्टील उद्योगाचे भवितव्य आणि जागतिक बाजारपेठ या विषयावर व्याख्यान संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बांधकाम स्टील उद्योगात प्रगतीसाठी परदेशातील प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक – पोलाद स्टील डायरेक्टर नितिन काबरा.

नगर :  देशाच्या विकासात आणि इंफ्रा स्ट्रक्चरची निर्मिती करण्यात स्टील कंपनीचा मोलाचा वाटा असतो.  विकसित देशांमध्ये स्टीलचे कटिंग केल्यावर जाणारे वेस्टेज आणि लागणारे मनुष्य बळ वाचवणे यासाठी फिक्स लांबीचे बार उपलब्ध आहेत. त्या मापाप्रमाणे इमारतीची उंची असली तर कॉलम साठी अश्या प्रकारचे रेडी स्टील वापरता येते. कंपनी निर्माण करत असलेल्या स्टीलसाठी स्क्रॅप मधील मधील अशुध्द घटक विघटित करून वेगवेगळ्या प्रोसेस करून योग्य त्या ग्रेडचे स्टील बनवले जाते. तसेच री-सायकल केलेले स्टील वापरणे हे भविष्यात शासकीय नियमाप्रमाणे क्रमप्राप्त होणार आहे. या सर्वांचा विचार करून पोलाद स्टील कंपनी ग्राहकांसाठी सर्वोत्तम स्टील उपलब्ध करून देते. इन्फ्रा स्ट्रक्चर अतिशय झपाट्याने वाढत असून स्टीलची मागणी त्याप्रमाणात करून देणे आता गरजेचे झाले असून जालना येथील स्टील कंपनी भारतातील मोठ्या प्रमाणात स्टील निर्मिती करून देते. भंगार साहित्य पुन्हा री सायकल करून आणि बिलेट चा वापर करून स्टील निर्मिती करणे गरजेचे असून सर्व मानांकने आणि कसोट्या पार करून चांगला प्रॉडक्ट बांधकामात वापरणे आवश्यक आहे. बांधकाम स्टील उद्योगात प्रगतीसाठी परदेशातील प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन नितिन काबरा यांनी केले

आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो अहमदनगर आणि पोलाद स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने पोलाद स्टील कंपनीचे संस्थापक संचालक नितीन काबरा यांचे संस्थेच्या सभासदांसाठी स्टील उद्योगाचे भवितव्य आणि जागतिक बाजारपेठ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पोलाद स्टीलचे असो .व्हाइस प्रेसिडेंट आशीष भाबडा, यश दायमा, आदेश गुंगे, मुख्य वितरक सुनिल बजाज तसेच एसा अध्यक्ष रमेश कार्ले, वैभव फिरोदिया, यश शहा, संकेत पादिर, उदय तरवडे, प्रितेश पाटोळे, संजय पवार, सुरेंद्र धर्माधिकारी, संजय चांडवले, कैलास ढोरे, दीपक मुथा, अजय दगडे, इकबाल सय्यद, विशारद पेटकर, संजय लोढा आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रदीप तांदळे यांनी सुत्रसंचालन केले तर आदिनाथ दहिफळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!