बाबरा गावामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने नुकसान झालेल्या पिकांची मा.आमदार सतिश चव्हाण यांनी केली पाहणी

0
113

फुलंब्री प्रतिनिधी – राधेश्याम हिवाळे

फुलंब्री तालुक्यात मंगऴवारी अचानक ढगफुटी झाल्याने अनेक गावामध्ये मुसळधार पाऊस झाला. बाबरा गावामध्ये या मुसळधार पाऊसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.मका,सोयाबीन,अद्रक,कपासी,तुर, फळबाग या मालाचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच काही दुकानातील मालाची नासाडी देखील झाली आहे. दुकाने,टपऱ्या वाहुन गेल्या आहेत,जनावरेही मोठ्य प्रमाणात दगावली आहेत.

नुकसानग्रस्त बाबरा गावामध्ये मा.ना.आमदार सतिश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जैस्वाल आदींनी पाहणी केली.

यावेळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे,सर्व तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशी सर्व शेतकऱ्यांनी चव्हाण यांच्याकडे मागणी केली.

यावेळी बाबरा सरपंच वाल्याबाई पवार,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कैलास पटेल ,बंटी देशमुख ,राजेंद्र चव्हाण , राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पाशुभाई शेख,डॉक्टर अंबादास काथार,संतोष तारु, नानेश्वर पवार,बबन चव्हाण,रेवनाथ बोलकर,पंढरीनाथ महिंद आदी गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here