संदेशनगरला साई-मंदिरास सदिच्छा भेट
अहमदनगर प्रतिनिधी – भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान शिर्डीचे साईबाबा म्हणून जशी ओळख झालेली आहे.त्याप्रमाणे आपल्या सावेडी उपनगरात संदेशनगर येथील साई-मंदिराची ख्याती जिल्ह्यात होत आहे.
शिर्डीस दर्शन घेतल्यावर मनाला मिळणारी शांती व वाढणारा आत्मविश्वास येथे आल्यावर देखील मिळतो.बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र देऊन तृप्त केले आहे,असे प्रतिपादन सह्यादी मल्टीस्टेट फायनान्सचे संस्थापक अध्यक्ष संदिप थोरात यांनी केले.
वसंत टेकडी जवळील संदेशनगरमध्ये साईबाबांची महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रमप्रसंगी श्री.व सौ. थोरात यांनी सपत्नीक साई मंदिरास सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सुनिल त्र्यंबके,सचिव योगेश पिंपळे,शुभांगी थोरात, राजआनंदचे संपादक विठ्ठल शिंदे,विशेष सरकारी वकिल मनिषा शिंदे-केळगंद्रे,१०८ अॅब्युलन्सच्या व्यवस्थापिका कांचन बिडवे,आकाश त्र्यंबके, आढाव महाराज,ह.भ.प.बांगर महाराज,तांबे मामा आदि मान्यवर उपस्थित होेते.
श्री.थोरात पुढे म्हणाले, साई-बाबांची महती सर्वांना ज्ञात आहे.श्रद्धा ठेवा सबुरीने घ्या फळ निश्चित मिळते. त्यामुळेच बाबा भक्तांची इच्छा पूर्ण करतात.याचा अनुभव आल्याने या मंदिरास भाविक नवसपूर्ती करतात.भविष्यात आपणदेखील सर्वोतोपरि सहकार्य करु,असे सांगितले.
यावेळी प्रभात बॅण्डचे संचालक गौरव राऊत यांनी बॅण्ड पथकासह साई बाबांची गाणी सादर केली.
यावेळी साई-भजन संध्या कार्यक्रम पार पडला.ह.भ.प बांगर महाराज यांनी साई-भजनाचा लाभ भक्तांना दिला.
नगर शहरातील महेश कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.तर विठ्ठल शिंदे,मनिषा शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला.
नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी प्रास्तविकात मंदिराची उभारणी पासून ते आतापर्यंतच्या झालेल्या विकास कामांबद्दल माहिती दिली.महाप्रसादासाठी अन्नदान करणारे, कायमस्वरुपी मंदिरासाठी मदत देणार्या भाविकांचे योगेश पिंपळे यांनी आभार मानले.